17. चार प्रकारचे ‘भक्त’
श्रीकृष्ण म्हणतात की भक्तांचे चार प्रकार असतात. पहिल्या प्रकारातील भक्तांना आयुष्यात ते तोंड देत असलेल्या अडचणी आणि दु:ख यातून सुटका हवी असते. दुसर्या प्रकारातील भक्तांना भौतिक सुखसुविधा आणि संपत्ती हवी असते. संस्कृती, लिंग आणि विश्वास पद्धती कोणतीही असो, बहुतांश भक्त याच दोन प्रकारात मोडतात. श्रीकृष्ण म्हणतात, या दोन प्रकारातील भक्त हे विविध देवतांची आराधना करतात आणि कर्मकांड करीत असतात. आपल्याला होत असलेल्या शारीरिक त्रासाकरिता संबंधित डॉक्टरांना गाठण्यासारखेच हे आहे. या भक्तांच्या श्रद्धेमुळेच त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होत असतात. थोडक्यात तो शरण जाण्याचा एक प्रकार आहे. खालील उदाहरणातून श्रद्धेची संकल्पना स्पष्ट होईल. दोन शेतकर्यांची एकमेकांच्या आजूबाजूला शेते होती आणि त्यांनी एक दिवस सिंचनाकरिता विहीर खोदायचे ठरवले. पहिला शेतकरी एक-दोन दिवस खोदत असे आणि पाणी न लागल्यास नव्या ठिकाणी खोदायला सुरुवात करीत असे. दुसर्या तकर्याने मात्र सातत्याने एकाच ठिकाणी खोदणे सुरूच ठेवले. महिन्याअखेरीस पहिल्या शेतकर्याच्या शेतात अनेक ठिकाणी केवळ खड्डे झाले होते आणि दुसर्या ...