Posts

112. आपल्यातील शत्रूपासून सावधान

Image
  श्रीकृष्ण म्हणतात की व्यक्ती स्वतःच्या उद्धारासाठी आणि स्वतःला अधोगतीला आणण्यासाठी जबाबदार आहे (6.5). ही जबाबदारी पार पाडण्यासाठी श्रीकृष्ण मार्गही सांगतात, ज्या जीवात्माने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले , त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले नाही , त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो ( 6.6 ) . महत्वाचे आहे स्वत:ला जिंकून घेणे. आत्मा हा शब्द श्लोक 6.5 आणि 6.6 मध्ये बारा वेळा येतो आणि त्याच्या विविध प्रकारच्या वापरामुळे विविध अर्थही निघतात. मात्र , साधकासाठी या श्लोकांमध्ये दिलेल्या संदर्भानुसार त्याचा अर्थ हा स्वत:ला जिंकून घेणे असाच आहे. श्रीकृष्ण म्हणतात , “ थंड-उष्ण , सुख-दुःख इत्यादी तसेच मान-अपमान यांमध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो ; म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काही नसतेच ” (6.7 ). याचा अर्थ सतत विद्यमान असलेल्या द्वंद्वांच्या पल्याड जाणे असाच आहे. सुख देणार्‍या अनेक लढाया अर्जुनाने जिंकल्या होत्या. ...

111. मैत्री स्वत:शी

Image
  श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात , “ स्वतःच स्वतःचा संसारसमुद्रातून उद्धार करून ध्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये , कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे ” (6.5) . मैत्रीप्रमाणेच या अस्तित्वात्मक श्लोकालाही अनेक आयाम आहेत. सगळ्यात आधी, यामुळे स्वत:चे उन्नयन करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीवर येते. वाईट म्हणून ओळखली जाणारी कर्मे केली किंवा आपल्याला अपेक्षित कर्मफल मिळाले नाही की साधारणत: त्याचा दोष आपण इतरांवर म्हणजे कुटुंब, मित्र, सहकारी, परिस्थिती, कामाच्या ठिकाणची परिस्थिती, देश अशा बाह्य घटकांना देतो. त्यामुळे अनेकांबद्दल आपल्या मनात खोलवर कटुता निर्माण होते आणि कधी कधी तर ती आयुष्यभर टिकून राहते. दुसर्‍या बाजूला, आपल्याला अशा खुपणार्‍या बाबींचे स्मरण होते त्या त्यावेळी आपण स्वत:लाच वारंवार शिक्षा करतो. परिणाम काहीही असोत, मात्र हा श्लोक आपल्याला स्वत:चे उन्नयन करण्यास सांगतो. शरण जाणे, प्रश्न विचारणे आणि सेवा हे तीन गुण जेव्हा आपण विकसित करतो तेव्हा शिक्षक (गुरू) आपल्याला मदत करण्यासाठी प्रकट होतो याचे आश्वासन कृष्णाने आपल्याला आधीच दिले आ...

110. द्वंद्वातीतातून शांती

Image
  श्रीकृष्ण म्हणतात , “ ज्याला संन्यास असे म्हणतात , तोच योग्य आहे , असे तू समज , कारण संकल्पांचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही ” (6.2) . आधी असेही म्हटले गेले आहे की ऋषीचे प्रयत्न हे काम आणि संकल्प विरहित असतात ( कामसंकल्पवर्जिताः ) ( 4.19 ) . श्रीकृष्ण पुढे म्हणतो, “ योगावर आरुढ होण्याची इच्छा करणार्‍या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी ‘निष्काम कर्म करणे’   हाच हेतू सांगितला आहे आणि योगारुढ झाल्यावर त्या योगारुढ पुरुषाचा जो सर्व संकल्पांचा अभाव असतो , तोच कल्याणाला कारण सांगितला आहे ( 6.3 ) . ज्यावेळी इंद्रियांच्या भोगांत किंवा कर्मांतही पुरुष आसक्त होत नाही , त्यावेळी सर्व संकल्पांचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते ” ( 6.4 ) . आपण असे मानतो की इच्छित कर्मफलाच्या प्राप्तीसाठी कर्म केले जातात आणि तसे नसेल तर कुणी कशासाठी कर्म करेल? येथे हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसेल किंवा तिचा अनुभव नसेल, याचा अर्थ असा नाही की ती गोष्टच अस्तित्वात नाही. पहिले, कर्मफलांसाठी केलेल्या आपल्या पूर्वीच्या कर्मांच्या अनुभवांचे विश्...

109. संन्यास म्हणजे कर्मफळाचे त्याग

Image
  आयुष्यात अनेक चढ-उतार येतात आणि आपण ते कसे हाताळतो यावर बरेच काही अवलंबून असते. परिस्थिती खडतर असते तेव्हा तणाव आणि नैराश्य येणे स्वाभाविक असते आणि अशावेळी आपण कर्मांचा त्याग करण्याचा विचार करायला लागतो. कारण, आपण सगळे या भ्रमात असतो की आपल्या आणि इतरांच्या कर्मामुळे आपल्याला सुख किंवा दु:ख मिळते. अर्जुनदेखील द्विधा मनस्थितीत आहे आणि युद्ध लढण्याचे कर्म त्यागण्याची त्याची इच्छा आहे. श्रीकृष्ण स्पष्ट करतात , “ जो पुरुष कर्मफलाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्मे करतो, तो संन्यासी व योगी होय. आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे ; तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे ” ( 6.1 ) . कर्तव्य कर्म बद्दल अधिक वर्णन केल्यास अधिक संभ्रम निर्माण होऊ शकतो कारण ती पूर्णपणे अनुभवण्याची बाब आहे. पोहावे कसे हे शिकण्यासाठी आपल्याला पाण्यात उडी मारावी लागते आणि त्याचप्रमाणे, करायच्या कृती समजून घेण्यासाठी आयुष्याला सामोरे जावे लागते. पोहोण्यासाठी तरंगणे जसे आहे तसेच इंद्रियांचा आधार न घेता आनंदी राहणे हा आपल्या प्रगतीचा निकष आहे. बीजाच्या गर्भाचे रक्षण करण्यासाठी त्यावर आवरण असणे गर...

108. भीतीवर मात करणे

Image
  श्रीकृष्ण म्हणतात, “काम, क्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांना सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण असतो”   ( 5.26 ) .   इच्छांच्या व्याधी आणि रागाचा मूर्खपणा यांपासून कसे मुक्त व्हावे हा खरा प्रश्न आहे. प्रत्येक चक्रीवादळ शांत होण्याचे एक केंद्र असते. त्याचप्रमाणे आपल्या इच्छा आणि रागाचे निर्मूलन होण्याचे आपल्यामध्ये एक केंद्र असते आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचे असते. त्यासाठी सर्व इच्छांचा मूलाधार असलेला ‘मी’ त्यागण्याचे धैर्य लागते. यासाठी एक तंत्र म्हणजे भूतकाळात केव्हा आपल्याला तीव्र इच्छा किंवा प्रचंड राग आला होता ती स्थिती पुन्हा अनुभवून बघणे. माझ्यातील ' आत्मा ' हा इतरांमधील ' आत्मा ' सारखाच आहे आणि वेगवेगळे लोक एकाच गोष्टीकडे विविध प्रकारे बघतात,’ असे स्वत:बद्दल अधिक जागरूक होऊन त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करावी. भारतीय संस्कृतीत आयुष्याला लीला म्हटले आहे म्हणजे हे केवळ एक नाटक आहे त्याला फार गंभीरपणे घेऊ नये. दुसरे तंत्र असे आहे की ज्याप्रमाणे आपण नाटक करतो तसे आयुष्याला फा...

107. आनंदासाठी ध्यान

Image
  पीनियल ग्रंथी हा वाटण्या एवढा पाइन शंकूच्या आकाराचा अवयव आहे जो मेंदूच्या मध्यभागी , थेट दोन भुवयांच्या मध्यभागांच्या असतो. शारीरिकदृष्ट्या ते मेलाटोनिन आणि सेरोटोनिन हे न्यूरोट्रांसमीटर तयार करते जे अनुक्रमे झोपेच्या चक्रासाठी व मूडसाठी जबाबदार असतात. याला तिसरा डोळा असेही म्हणतात कारण त्यात सामान्य डोळ्याप्रमाणे फोटोरिसेप्टर्स असतात. प्रत्येक संस्कृतीत या जागेचे विविध प्रकारे आत्म्याची जागा म्हणून वर्णन केले आहे. ही जागा आपल्यातील आध्यात्मिक उन्नतीसाठी जबाबदार आहे. आपल्या पाच इंद्रियांपलीकडील ही सहावी संवेदना आहे. आध्यात्मिक जागरणाचे चिन्ह आहे. भौतिक आणि आध्यात्मिक जगाला जोडणारा दुवा आहे. भारतामधे , भुवयांच्यामधील या जागेला आज्ञाचक्र असे म्हणतात. ही पार्श्वभूमी समजून घेतल्यामुळे इंद्रिये आणि मनावर नियंत्रण ठेवण्याची श्रीकृष्णाची पद्धत आपल्याला कळून येईल. “ बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून , दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान सम करून ज्याने इंद्रिये , मन व बुद्धी जिंकली आहेत , असा मोक्षतत्पर मुनी इच्छा , भय आणि क्रोध ...

106. सुखाचा लगाम

Image
  मध्य आशियातून आलेल्या एका आक्रमकाने एकदा दिल्ली जिंकली आणि त्यानिमित्त त्याला विजययात्रा काढायची इच्छा झाली. सजवलेल्या हत्तीवर तो बसला आणि त्याने हत्तीचा लगाम मागितला. हत्तीचे नियंत्रण माहुताकडे आहे असे सांगितल्यावर त्याने लगेच हत्तीवरून खाली उडी मारली आणि लगोलग आपला घोडा बोलविला. तो म्हणाला, तो कधीही अशा स्वार होत नाही ज्याचे नियंत्रण दुसर्याच्या हातात आहे. त्याचप्रमाणे आपणही हा विचार करायला हवा की आपला सुख आणि भावना यांचे नियंत्रण आपल्या हाती आहे की इतरांच्या हाती आहे. आपल्यापैकी सगळ्यांना वाटते की लगाम आपल्या हाती आहे मात्र प्रत्यक्षात तो इतरांच्याच हाती असतो. एखादा मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा कामाच्या ठिकाणचा सहकारी, एखादा पदार्थ, पेय किंवा एखादी वस्तू, चांगली किंवा वाईट परिस्थिती, आपला भूतकाळ किंवा भविष्य यांपैकी कशाचाही आपल्या भावनांवर परिणाम होऊ शकतो. या संदर्भात श्रीकृष्ण म्हणतात की , “ जो साधक या मनुष्यशरीरात देहत्यागाआधी काम-क्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी होय व तोच सुखी होय ”   ( 5.23 ) . इतरांकडून सुख मिळवण्याची इच्छा ही वा...