Posts

Showing posts from May, 2024

22. संतुलन हा परमानंद आहे

Image
  गीतेच्या अगदी सुरुवातीला श्रीकृष्ण म्हणतात की , इंद्रियांचे बाह्य वस्तूंशी मिलन झाल्यामुळे सुख आणि दुःख होते (2.14). तो अर्जुनाला त्यांना सहन करणे शिकायला , कारण ते अ शाश्वत आहेत. समकालीन जगात याला ‘ हाही काळ जाईल ’ असे म्हणतात. जर ते प्रायोगिक स्तरावर विकसित केले गेले , तर आपण या ध्रुवांच्या पलीकडे जाऊ शकतो आणि त्यांना समानतेने स्वीकारण्याची क्षमता असू शकते. आपल्याकडे पाच इंद्रिये आहेत; दृष्टी, ऐकणे, गंध, चव आणि स्पर्श. ती अनुक्रमे डोळे , कान, नाक, जीभ आणि त्वचा या पाच अवयवांशी संबंधित आहेत. विविध अवयवांकडून आलेल्या अनुभवांवर प्रक्रिया करण्याचे काम मेंदूतील विशिष्ट भागाकडे असते. तथापि , या संवेदी साधनांना अनेक मर्यादा आहेत. उदाहरणार्थ डोळा , तो प्रकाशाच्या विशिष्ट वारंवारतेवर प्रक्रिया करू शकतो ज्याला आपण दृश्यमान प्रकाश म्हणतो. दुसरे , तो प्रति सेकंद 15 पेक्षा जास्त प्रतिमांवर प्रक्रिया करू शकत नाही आणि हा चित्रपट तयार करण्यासाठी आधार आहे जा आपल्याला स्क्रीनवर पाहण्यात आनंद होतो. तिसरे, आपल्याला एखादी वस्तू बघणे शक्य व्हावे यासाठी एका किमान पातळीवरचा प्रकाश आवश्यक असते. इ...

21. कल्पकता नष्ट करता येत नाही

Image
  अंतरात्म्याला समजून घेण्याच्या प्रयत्नात दोन प्रकारच्या शहाण्या बुद्धिमंतांनी मानवजातीला मदत केली आहे. एक जण सकारात्मक पद्धतीने विचार करतो तर दुसरा नकारात्मक बाजूकडे लक्ष वेधतो आणि या दोघांचेही गंतव्यस्थान एकच असते. दोघांच्या प्रवासाच्या प्रारंभबिंदूमध्ये फरक आहे आणि आपल्या स्वभावानुसार मार्गाची निवड ठरते. सकारात्मक दिशा देणारे ' ते ' जे अविनाशी , शाश्वत , स्थिर आणि सर्वव्यापी आहे असे ' पूर्ण ' म्हणून वर्णन करते , ज्यामध्ये काहीही जोडायचे नाही. ‘ सर्जनशीलता ’ हे याचं रूपक आहे. नकारात्मक दिशा देणारे ' ते ' जे अविनाशी , शाश्वत , अचल आणि सर्वव्यापी आहे असे वर्णन ' शून्य ' असे करतात ज्यातून काहीही बाहेर काढून घेता येत नाही. ‘ अवकाश ’ हे याचं रूपक आहे. दोन्ही बाबतीत, सर्जनशीलता आणि अवकाश हे निर्मिती/भौतिक प्रकटीकरण करू शकतात. आपण हे स्वत:हून समजून घेऊ शकतो की सर्जनशीलतेमुळे निर्मिती होते. दुसरीकडे , विज्ञान या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे की हे विश्व ' काहीच नाही ' ने बनले आहे आणि हे विश्व अस्तित्वात आणण्याची क्षमता अवकाशात आहे. सर्वात लहान अ...

20. मृत्यू आपल्याला मारत नाही

Image
  श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात , असा कोणताही काळ , भूतकाळ , वर्तमान किंवा भविष्य नाही , जेव्हा तू , मी आणि रणांगणावर उपस्थित असलेले हे राजे लोक नव्हते , किंवा नसतील (2.12). ते पुढे म्हणतात की जे शाश्वत अस्तित्व अविनाशी आहे , त्याचे भौतिक पैलू नष्ट होणे निश्चित आहे आणि म्हणूनच पुढील लढाई लढली पाहिजे. हे शाश्वत अस्तित्व आत्मा किंवा चेतना इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. त्यालाच श्रीकृष्ण देही म्हणतात. निर्मितीच्या गाभ्यापासून श्रीकृष्ण प्रारंभ करतात आणि जीवाबद्दल बोलतात, असा जीव जो अविनाशी आहे, जो मोजता येत नाही, सर्वांना व्यापून आहे आणि शाश्वत आहे. दुसरे, याच शाश्वत जीवाला भौतिक बाजू आहे जी निश्चितपणे नष्ट होणार आहे. श्रीकृष्ण जेव्हा राज्यकर्त्यांबद्दल बोलतात तेव्हा ते त्यांच्यातील जीवित बाबीबद्दल बोलतात जी अविनाशी आहे आणि शाश्वत आहे. आपण सगळेच दोन भागांचे बनलो आहोत. पहिला भाग म्हणजे शरीर आणि मन जे निश्चितपणे नष्ट होणार आहे. त्यांना सुख आणि दु:ख अशा दोन्ही बाबींना सामोरे जावे लागते आणि अर्जुनाला आता दु:खाचा सामना करावा लागतो आहे. दुसरा भाग आहे देही, जो शाश्वत आहे. श्रीकृष्ण यावर...

19. सर्जनशीलता निर्माण करते

Image
  श्रीकृष्ण म्हणतात की जे सत्य आहे ते वास्तविक असते आणि त्याचे स्थायीत्व कधीही संपत नाही. असत्य हे भ्रामक आणि तात्पुरते असते , त्याचे अस्तित्व नसते. जे अविनाशी आहे आणि जे सर्वव्यापक आहे त्याचे चिंतन करण्यास श्रीकृष्ण सांगतात (2.17). सामान्यत: असे मानले जाते एखादी गोष्ट ही त्या कर्त्याची निर्मिती आहे. मात्र, श्रीकृष्ण सर्जनशीलतेकडे लक्ष वेधतात, जी सतत विकसित होत जाणारी शक्ती आहे. उदाहरणार्थ, बीजांमधून अंकुरांची निर्मिती. बीज आणि अंकुर (दोन्ही सर्जनशील निर्मिती) नष्ट केले जाऊ शकते, मात्र सर्जनशीलता नाही, जी सतत अविश्रांतपणे कार्यरत असते आणि भवतालाला व्यापून उरलेली असते. निर्मितीचा जन्म होतो आणि मृत्यूनंतर ती अस्तित्वात नसते मात्र सर्जनशीलता नष्ट करता येत नाही. सर्जनशीलता हीच खरी कर्ता आहे कारण ती निर्मितीला जन्म देते. ती भावनांची निर्मिती करते. ती आपले शरीर आणि मन यांसारख्या गोष्टींची निर्मिती करते. ज्ञान आणि स्मरणे ही नेहमी भूतकाळाशी संबंधित असतात तर निर्मिती (कर्मफल) हे भविष्य असते. सर्जनशीलता मात्र नेहमीच वर्तमानाशी निगडित असते. सर्जनशीलता ही इंद्रियांनी घेतलेले चांगले ...

18. ‘सत’ आणि ‘असत’

Image
  श्रीकृष्ण म्हणतात, सत कधी (सत्य/कायम) संपत नाही आणि असत (असत्य/क्षणिक) अस्तित्वातच नसते. या दोन्ही मधला फरक ओळखू शकतो तो ज्ञानी असतो ( 2.16 ). सत आणि असत यांच्यातील फरक दाखवून देण्यासाठी अनेक संस्कृतींमध्ये दोरी आणि साप यांचे उदाहरण देण्यात येते. एक मनुष्य सायंकाळी आपल्या घरी परतला आणि प्रवेशद्वारापाशी त्याला एक साप गुंडाळी करून बसलेला दिसला. प्रत्यक्षात त्याच्या मुलांनी खेळता खेळता सोडून दिलेली ती एक दोरी होती मात्र, सायंकाळच्या अंधुक प्रकाशात त्याला तो साप वाटला. येथे दोरी हे सतचे तर साप हे असतचे प्रतिक आहे. जोपर्यंत तो सत, उदाहरणार्थ दोरी, काय आहे हे जाणून घेत नाही, तोपर्यंत तो असतला- येथे काल्पनिक साप- कसे हाताळावे याचाच विचार आणि कृती करत राहील. तो त्याला काठीने मारेल, पळून जाईल किंवा खरे काय हे जाणून घेण्यासाठी तो विजेरीच्या प्रकाशाचा झोत त्यावर टाकेल. आपले आकलन जेव्हा असत असते तेव्हा उत्तमातील उत्तम योजना आणि कौशल्ये वाया जातात. असतचा जन्म सतमधूनच होतो, जसे दोरीशिवाय साप अस्तित्वात असूच   शकत नाही. सतमुळेच असतचे अस्तित्व असल्याने, ते आपल्याला दु:स्वप्नासारखे भासू श...