Posts

Showing posts from March, 2026

107. आनंदासाठी ध्यान

Image
  पीनियल ग्रंथी हा वाटण्या एवढा पाइन शंकूच्या आकाराचा अवयव आहे जो मेंदूच्या मध्यभागी , थेट दोन भुवयांच्या मध्यभागांच्या असतो. शारीरिकदृष्ट्या ते मेलाटोनिन आणि सेरोटोनिन हे न्यूरोट्रांसमीटर तयार करते जे अनुक्रमे झोपेच्या चक्रासाठी व मूडसाठी जबाबदार असतात. याला तिसरा डोळा असेही म्हणतात कारण त्यात सामान्य डोळ्याप्रमाणे फोटोरिसेप्टर्स असतात. प्रत्येक संस्कृतीत या जागेचे विविध प्रकारे आत्म्याची जागा म्हणून वर्णन केले आहे. ही जागा आपल्यातील आध्यात्मिक उन्नतीसाठी जबाबदार आहे. आपल्या पाच इंद्रियांपलीकडील ही सहावी संवेदना आहे. आध्यात्मिक जागरणाचे चिन्ह आहे. भौतिक आणि आध्यात्मिक जगाला जोडणारा दुवा आहे. भारतामधे , भुवयांच्यामधील या जागेला आज्ञाचक्र असे म्हणतात. ही पार्श्वभूमी समजून घेतल्यामुळे इंद्रिये आणि मनावर नियंत्रण ठेवण्याची श्रीकृष्णाची पद्धत आपल्याला कळून येईल. “ बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून , दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान सम करून ज्याने इंद्रिये , मन व बुद्धी जिंकली आहेत , असा मोक्षतत्पर मुनी इच्छा , भय आणि क्रोध ...

106. सुखाचा लगाम

Image
  मध्य आशियातून आलेल्या एका आक्रमकाने एकदा दिल्ली जिंकली आणि त्यानिमित्त त्याला विजययात्रा काढायची इच्छा झाली. सजवलेल्या हत्तीवर तो बसला आणि त्याने हत्तीचा लगाम मागितला. हत्तीचे नियंत्रण माहुताकडे आहे असे सांगितल्यावर त्याने लगेच हत्तीवरून खाली उडी मारली आणि लगोलग आपला घोडा बोलविला. तो म्हणाला, तो कधीही अशा स्वार होत नाही ज्याचे नियंत्रण दुसर्याच्या हातात आहे. त्याचप्रमाणे आपणही हा विचार करायला हवा की आपला सुख आणि भावना यांचे नियंत्रण आपल्या हाती आहे की इतरांच्या हाती आहे. आपल्यापैकी सगळ्यांना वाटते की लगाम आपल्या हाती आहे मात्र प्रत्यक्षात तो इतरांच्याच हाती असतो. एखादा मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा कामाच्या ठिकाणचा सहकारी, एखादा पदार्थ, पेय किंवा एखादी वस्तू, चांगली किंवा वाईट परिस्थिती, आपला भूतकाळ किंवा भविष्य यांपैकी कशाचाही आपल्या भावनांवर परिणाम होऊ शकतो. या संदर्भात श्रीकृष्ण म्हणतात की , “ जो साधक या मनुष्यशरीरात देहत्यागाआधी काम-क्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी होय व तोच सुखी होय ”   ( 5.23 ) . इतरांकडून सुख मिळवण्याची इच्छा ही वा...

105. शाश्वत आनंद

Image
  श्रीकृष्ण म्हणतात की जे परमात्मामधे स्थिर झालेय, ज्यांना दैवी ज्ञानाची समज आली आहे आणि ते कोणत्याही संभ्रमात नाहीत, असे व्यक्ती काही प्रिय प्राप्त झाले तरी आनंदित होत नाहीत किंवा अप्रिय प्राप्तीमुळे उद्विग्न होत नाहीत ( 5.20 ) .   आपण परिस्थिती आणि लोकांची सुखद आणि अप्रिय अशी विभागणी करतो आणि शहाणा माणूस ही विभागणी सोडून देतो. आपले काय आहे आणि काय नाही याबद्दलच्या चुकीच्या आकलनामुळे निर्माण होणार्‍या मोहापासून दूर जाण्याचा सल्ला श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार देतो. आपण आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून सुख मिळवू शकतो हा आपला सगळ्यांत मोठा संभ्रम आहे. दुसर्‍या बाजूला श्रीकृष्ण जेव्हा म्हणतात की ज्याच्या अंत:करणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते असा साधक आत्म्यात असलेल्या, ध्यानामुळे मिळणार्‍या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. योगाद्वारे भगवंताशी जोडले गेल्याने ते शाश्वत आनंद अनुभवतात ( 5.21 ) . श्रीकृष्ण सावध करतात की सांसारिक वस्तूंच्या संपर्कातून निर्माण होणारे सुख जरी सांसारिक लोकांना आनंददायी वाटत असले तरी प्रत्यक्षात ते दुःखाचे मूळ आहे. अशा सुखांना सुरुवात आणि शेवट असतो , म...