50. राग, भय आणि क्रोध
श्रीकृष्ण म्हणतात की , दु:खदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद होतो नाही , सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही , तसेच ज्याचे प्रीती , भय व क्रोध नाहीसे झाले आहेत , असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो (2.56). हा श्लोक 2.38 चाच विस्तार आहे ज्यामध्ये श्रीकृष्ण असे म्हणतात सुख आणि दु:ख , लाभ आणि हानी , जय आणि पराजय यांकडे समान भावाने बघावे. आपण सर्वजण सुखाचा शोध घेतो पण दु:ख आपल्या जीवनात अपरिहार्यपणे येते कारण हे दोन्ही द्वैतांच्या जोडीने अस्तित्वात असतात. हे मासा पकडण्यासाठी लावलेल्या आमिषासारखे आहे जेथे आमिषाच्या मागे आकडा लपलेला असतो. स्थितप्रज्ञ तो असतो जो या द्वंद्वांच्या पल्याड जातो आणि द्वंद्वातीत ही स्थिती प्राप्त करतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची इच्छा धरतो तेव्हा त्यापा ठो पाठ दुसरी गोष्ट येणार हे निश्चित असते, मग त्याचा आकार, वेळ वेगळी असूही शकते. जेव्हा आपण आपल्या योजनेने आनंद मिळवतो तेव्हा अहंकार उत्तेजित होतो , जो उत्साह असतो , परंतु जेव्हा त्याचे दुःखात रूपांतर होते तेव्हा अहंकार दुखावतो , जो दुःख असतो. हा काही नसून अहंकाराचा खेळ आहे. हे समजून ज्ञा...