Posts

Showing posts from July, 2025

81. ‘मी’ समाविष्ट आहे

Image
  गीतेमध्ये अर्जुन आणि श्रीकृष्ण असे दोघेही ‘मी’चा वापर करतात मात्र दोघांच्या ‘मी’चे अर्थ आणि संदर्भ वेगळे आहेत. अर्जुनाचा मी हा त्याचे शरीर, संपत्ती, भावना आणि मान्यता तसेच त्याचे कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांशी निगडित आहे. आपली परिस्थितीदेखील अर्जुनापेक्षा वेगळी नाही. आपणही काही गोष्टी या आपल्याच आहेत आणि काही नाहीच असे समजतो. श्रीकृष्ण जेव्हा ‘मी’ चा उपयोग करतात तेव्हा ते सर्वसमावेशक असते. आपल्या इंद्रियांच्या मर्यादित क्षमतांमुळे आपल्याला भासणारे सर्व द्वंद्व आणि विरोधाभास तो सामावून घेतो. इतरत्र एका ठिकाणी श्रीकृष्ण जेव्हा असे म्हणतात की ‘मीच जन्म आहे आणि मीच मृत्यूही’ त्याचाही हा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे. श्रीकृष्ण हा सागर असला तरी आपण त्याच सागराचे थेंब आहोत. पण अहंकारामुळे आपण स्वतःला वेगळे समजतो. जेव्हा एक थेंब आपले अस्तित्व सोडून समुद्रात मिसळतो तेव्हा तो महासागर बनतो. श्रीकृष्ण हे सूचित करतात जेव्हा ते म्हणतात , " माझा जन्म आणि कृती दैवी म्हणजेच अलौकिक आहेत , अशा प्रकारे तत्वांपासून जाणणारा मनुष्य , तो देह सोडल्यानंतर पुनर्जन्म प्राप्त करत नाही ,   पण फक्त मलाच प...

80. मायेचे प्रकटीकरण

Image
  फिरत्या चाकाला फिरण्यासाठी जसे स्थिर असे एक्सल हवे असते तसे सतत बदलणार्‍या भौतिक जगाला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी शांत आणि स्थायी अशी अप्रकट गोष्ट हवी असते. अर्जुन आपल्याप्रमाणेच दृश्य स्वरुपातील मानव आहे आणि त्याला तशाच प्रकट स्वरुपातील आपल्या नातेवाईकांची मृत्युची चिंता लागली आहे. सर्वश्रेष्ठ असा श्रीकृष्ण ज्याने सध्या प्रकट रुप धारण केले आहे तो अर्जुनाला हे समजावून सांगतो आहे की अप्रकटालाही कधी कधी प्रकट रुप धारण करण्याची गरज भासते. श्रीकृष्ण म्हणतो , " मी अजन्मा , शाश्वत आणि सर्व प्राणीमात्रांचा स्वामी आहे. माझ्या स्वभावाला वश करून , मी माझ्या योगमायेद्वारे अवतार घेतो ” ( 4.6 ). मायेद्वारे , जी केवळ एक कल्पना आहे , अव्यक्त प्रकट होते , जसे परमात्मा करतो. फरक फक्त जाणीव , इच्छा आणि करुणेच्या पातळीवर आहे. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, “ज्या ज्या वेळी धर्माचा र्‍हास होतो आणि अधर्म प्रबळ होतो, त्या त्या वेळी मी प्रकट होतो ( 4.7 ) . सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या निर्दालनासाठी आणि धर्मसंस्थापनेसाठी मी युगानुयुगे जन्म घेतो आहे ’’ ( 4.8 ) . सज्जनांच्या रक्षणार्थ परमात्मा निश्...

79. काळाच्या पल्याड

Image
  श्रीमद्भगवद्गीता हे दोन स्तरांचे सुसंवादी मिश्रण आहे आणि गीता समजून घेण्यासाठी आपल्याला याची जाणीव असणे आवश्यक आहे. काहीवेळा श्रीकृष्ण अर्जुनाचा मित्र किंवा मार्गदर्शक म्हणून येतो आणि मानवांना भेडसावणाऱ्या रोजच्या समस्या समजावून सांगतो. कधी कधी तो परमभगवानाच्या रूपाने येतो आणि त्या अवस्थेत तो म्हणतो की , हा अविनाशी योग मी विवस्वतला दिला , जे एकापाठोपाठ राजर्षींच्या स्वाधीन केले गेले ( 4 . 1 ) आणि कालांतराने हा योग नाहीसा झाला ( 4 . 2 ). विवस्वताला सूर्यदेव म्हटले आहे याचा अर्थ हा की प्रकाशासाठी ते रुपक म्हणून वापरले आहे. आता हे स्वीकारले गेले आहे की विश्वाला प्रारंभ प्रकाशापासून झाला आणि नंतर इतर गोष्टींची निर्मिती झाली. पण श्रीकृष्ण ते प्रकाशापूर्वीच होते असे सूचित करत आहेत. श्रीकृष्ण ने नमूद केलेले राजऋषी म्हणजे विविध काळातील ज्ञानी माणसे आहेत. हे ज्ञान काळाच्या ओघात अदृष्य झाले कारण प्रयोगाच्या पातळीवरून ते केवळ कर्मकांडाच्या पातळीवर आले. आचरणापेक्षा केवळ प्रवचनांपुरते ते मर्यादित राहिले आणि त्याला धर्म आणि संप्रदायांचे स्वरुप आले. अर्जुनाला प्रश्न पडतो की , श्रीकृष्णाने...

78. इच्छांची शक्ती

Image
  एकदा तुलसीदासांच्या मनात आपल्या नवविवाहित पत्नीला भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. एका प्रेताचे आधार घेऊन त्यांनी नदी पार केली , एका सापाचा आधार घेऊन भिंत ओलांडून ते पत्नीजवळ जाऊन पोहोचले. मात्र , इतकी तीव्र इच्छ त्यांना प्रभू श्रीरामाबद्दल असती तर जास्त बरे झाले असते असे म्हणत पत्नीनेच त्यांची कानउघाडणी केली. त्या क्षणाला त्यांच्यात परिवर्तन घडून आले आणि त्यांनी पुढे जाऊन रामचरितमानस सारखा महान ग्रंथ लिहिला. तुलसीदासची कथा आपल्याला इंद्रियांना शिस्त लावून इच्छा नष्ट करण्याचा श्रीकृष्णाचा सल्ला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते (3.41). इच्छांची दोन रूपे आहेत. पहिली म्हणजे आपल्यात निर्माण होणारी धैर्य , दृढनिश्चय आणि उत्कटतेची उर्जा आणि दुसरी त्याची दिशा. जर या उर्जेची दिशा बाह्य असेल तर तिचे रूपांतर भौतिक सुख आणि वस्तूंच्या इच्छेमध्ये होते. श्रीकृष्ण जेव्हा तुमच्या इच्छा नष्ट करायला सांगतात तेव्हा ते तुम्हाला ही उर्जा नष्ट करायला सांगत नसून ती तुलसीदासांप्रमाणे अंतर्मुख करायला सांगतात. आव्हानात्मक अशा आध्यात्मिक प्रवासाकरिता ही ऊर्जा आवश्यक असते. एखाद्या उपग्रहाला...