104. निष्पक्षता साधणे
श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचे मन आणि बुद्धी ‘त्या’ परमतत्त्वाशी एकरूप झाले आहेत आणि परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परम गतीला प्राप्त होतात ( 5.17 ) . जाणिवविहीन जगणे म्हणजे अंधारात जगण्यासारखे आहे, जेथे आपण सारखे धडपडतो आणि स्वतःला ईजा करून वघेतो . पुढचा टप्पा म्हणजे प्रकाशाच्या क्षणिक झोताप्रमाणे आपण जाणिवेचाही क्षणभर अनुभव घेतो आणि पुन्हा अज्ञानात ढकलले जातो. अंतिम स्थिती म्हणजे सूर्यप्रकाशासारखी सत्याची शाश्वत अनुभूती होणे जेथे जाणिव एका महत्वपूर्ण पातळीपर्यंत जाते आणि व्यक्ती तेथून परत येऊ शकत नाही. परत न येण्याच्या या अवस्थेला मोक्ष किंवा परम स्वातंत्र्य असेही म्हणतात. ही माझी मुक्ती नाही, उलट ‘ मी ’ पासून स्वातंत्र्य आहे कारण सर्व समस्या ‘ मी ’ मुळे आहेत. ही न परतण्याची पातळी गाठली की समत्व प्राप्त होते. या संदर्भात श्रीकृष्ण म्हणतात की ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण , गाय , हत्ती , कुत्रा आणि चांडाळ या सर्वांनां समदृष्टीनेच पाहतात (5.18). समत्व हे गीतेच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे. सगळ...