77. आरशा सारखे साक्षीदार बना
श्रीकृष्ण हे स्पष्ट करतात की , “ ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो , त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित रा हा ते. आणि हे अर्जुना! कधीही तृप्त न होणारा हा काम रू प अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने माणसांचे ज्ञान झाकले आहे ” ( 3.38-3.39 ) . आधी श्रीकृष्ण ने असेही म्हटले आहे की गुणांमध्ये व्यक्तीला संमोहित करण्याची शक्ती असते. रजोगुणातून निर्माण झालेल्या इच्छादेखील असेच करतात. त्यांनी पुढे सविस्तर सांगितले की , “ इंद्रिये , मन आणि बुद्धी ही याचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मन , बुद्धी आणि इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्माला मोहित करतो" ( 3.40). आरसा हे साक्षीभावाचे उत्तम उदाहरण आहे. परिस्थिती किंवा व्यक्ती यांपैकी जे काही समोर येईल ते जसेच्या तसे दाखवणे हे आरशाचे काम आहे. त्याच्यावर ना भूतकाळाचे दडपण आहे ना भविष्याच्या अपेक्षा आणि तो केवळ वर्तमान दाखवत असतो. या शहाणपणावर धूळ साचते तेव्हा त्याची परिणामकारकता कमी होते. या रुपकातील आरसा हा आपला खरा स्वभाव आहे आणि त्यावरील धूळ ही आपली जुनी कर्मे आणि ...