Posts

Showing posts from July, 2024

34. कर्मावर लक्ष केंद्रित करा, कर्मफलावर नाही

Image
    गीतेच्या सुप्रसिद्ध श्लोक 2.47 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे , त्याच्या परिणामांवर म्हणजेच कर्मफलांवर आपला अधिकार नाही. ते पुढे म्हणतात की कर्माचे फळ हे आपल्या कोणत्याही कृतीची प्रेरणा असू नये आणि कृती न करण्याकडे आपला कल नसावा. हा गीतेचा सर्वात उद्धृत श्लोक आहे कारण तो जीवनाच्या विविध आयामांमध्ये पाहिला जाऊ शकतो. श्रीकृष्ण सूचित करतात की श्रद्धा चमत्कार करू शकतो (7.21-7.22). हा श्लोक समजून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्रीकृष्णावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या तर्कशास्त्रात खोलवर न जाता किंवा त्याच्या विविध पैलूंचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न न करता ते आपल्या जीवनात लागू करणे. आपण श्रीकृष्णावरील आपली श्रद्धा अधिक दृढ केली पाहिजे आणि त्याचे आचरण सुरू केले पाहिजे. या श्लोकाचा शाब्दिक अर्थ आचरणात आणला तरच आपण कर्मयोगाच्या शिखरावर पोहोचू शकतो. त्यापुढची पायरी हे समजून घेण्याची आहे की कर्मफलावर आपण लक्ष केंद्रित केल्यास आपले कर्मावरील लक्ष ढळू शकते आणि त्याचा परिणाम म्हणून कर्मफलदेखील हिरावून घेतले जाऊ शकते. चांगला अभ्यास न केल्यामुळ...

33. अंतरात्मा वेदांच्या पलीकडे आहे

Image
  एकदा , काही मित्र प्रवास करत होते आणि त्यांना एक विस्तीर्ण नदी पार करावी लागली. त्यांनी एक बोट बनवली आणि नदी पार केली. मग उपयोग होईल असा विचार करून उरलेल्या प्रवासात जड बोट सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचा प्रवास संथ आणि वेदनादायी झाला. इथे नदी म्हणजे वेदनेची ध्रुवता आहे आणि बोट हे वेदना दूर करण्याचे साधन आहे. त्याचप्रमाणे, आपल्या रोजच्या आयुष्य़ातही अशा दु:खाच्या द्वंद्वावर मात करण्यासाठी अनेक साधले आणि प्रथा आपल्याला उपलब्ध आहेत. तात्कालिक दु:खाच्या द्वंद्वांपासून मुक्ती मिळविण्यासाठी वेदांमध्ये अनेक प्रथा आणि कर्मकांड सांगितले आहे आणि त्यापैकी अनेक आजही आचरणात आणले जातात. आरोग्य, व्यवसाय, काम आणि कुटुंबाच्या संदर्भात येणार्‍या अडचणींसाठी अशा कर्मकांडांचा आश्रय घेणे हे तर्कशुद्धही वाटते. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की , वेदांचा बाह्य अर्थ सांगून या जन्मात आणि पुढील जगामध्ये (स्वर्गात) सुखाचे वचन देणाऱ्या मूर्खांच्या शब्दात अडकू नये (2.42-2.46). आत्मवान होण्यासाठी तो अर्जुनाला द्वंद्वातीत आणि गुणातीत होण्यास प्रोत्साहित करतो (2.45). जेव्हा एखादा मोठा तलाव सा...

32. मन:शांतीची आधारशिला

Image
  कर्मयोगामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की, “ या कर्मयोगात निश्चयात्म बुद्धी एकच असते. परन्तु अस्थिर विचार असणार्‍या माणसांच्या बुद्धी पुष्कळ फाटे फुटलेल्या असतात ” ( 2.41 ). श्रीकृष्ण म्हणतात की समत्व म्हणजे योग आहे आणि ते दोन द्वंद्वांचे एकत्रीकरण आहे , उदाहरणार्थ सुख आणि दु:ख , जीत आणि हार आणि नफा व तोटा इत्यादी. या द्वंद्वांना ओलांडून पुढे जाण्यासाठीचा मार्ग म्हणजे कर्मयोग आहे , जो अंतिमत: सुसंगत बुद्धिमत्तेकडे वळतो. दुसऱ्या बाजूला , असंतुलित बुद्धिमत्तेमुळे आपल्या मनाची शांतता ढळते (2.48 आणि 2.38). सामान्यत: आपण असे गृहित धरतो की भौतिक सुखे, विजय आणि लाभ यातून मनाची शांतता आपोआप मिळते. मात्र श्रीकृष्ण म्हणतात की कर्मयोगाच्या सरावामुळे मिळालेली सुसंगत बुद्धिमत्ता आपल्याला सगळ्या द्वंद्वांच्या पल्याड जाण्यास आणि मनाची शांतता मिळविण्यास मदत करते. चंचल बुद्धिमत्तेमुळे आपण विविध परिस्थिती, परिणाम आणि लोकांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. आपल्या कामाच्या ठिकाणी आपण आपल्या खाली आणि वर असलेल्या लोकांबद्दल वेगवेगळे निकष वापरतो. कुटुंबामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीसाठी वेगवेगळे निकष व...

31. कर्मयोगात कमी कष्टाने मोठा लाभ

Image
    श्री कृष्ण आश्वासन देतात की कर्मयोगाचे थोडेसे साधन देखील परिणाम देते आणि हा धर्म आपल्याला मोठ्या भीतीपासून वाचवतो (2.40). लक्षात घेण्यासारखे आहे की सांख्ययोग हा शुद्ध जागृती आहे , तर कर्मयोगासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. आपला आध्यात्मिक प्रवास नुकताच सुरू केलेल्या आणि हे प्रयत्न अत्यंत कष्टदायक वाटणार्‍या भक्तांना भगवान श्रीकृष्ण हे आश्वासन देतात. श्रीकृष्णाला आपल्या अडचणी माहिती आहेत आणि तो खात्री देतो की लहानसा प्रयत्नही मोठे परिणाम घडवून आणू शकतो. निष्काम कर्म आणि समत्वाचा मार्ग अवलंबण्यासाठी तो आपल्याला प्रोत्साहन देतो. एक मार्ग म्हणजे श्रीकृष्ण ने सांगितलेल्या भक्तीने कर्मयोगाचा अभ्यास सुरू करणे. कालांतराने , जसे आपण कर्मयोगाच्या दृष्टीकोनातून आपले अनुभव पाहण्याचा सराव करतो , तेव्हा आपण आपल्या अंतरंगात पोहोचेपर्यंत आपले अनुभव अधिक सखोल होत जातात. आणखी एक मार्ग म्हणजे आपली भीती समजून घेणे आणि ती घालविण्यासाठी कर्मयोगाचा सराव कसा करायचा हे समजून घेणे. आपल्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष जग यांच्यातील फरक म्हणजेच भीतीचा गाभा असतो. कर्मयोग आपल्याला निष्काम कर्माबद्दल शिकवत...

30. पाणी, वाळू आणि दगडावर लिहिणे

Image
  श्रीकृष्ण म्हणतात की सांख्ययोग ( 2.11-2.38 ) बद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर ते आता योग म्हणजे कर्मयोगाचे स्पष्टीकरण देतील , ज्याचा अभ्यास माणसाला कर्माच्या बंधनातून मुक्त करेल ( 2.39 ). सांख्य योग सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तो एक नष्ट न करता येणारे चैतन्य आहे (जाणीव) ज्याला मरण नाही. या श्लोकापासून पुढे श्रीकृष्ण कर्मयोगाचा माध्यमातून हेच सांगू इच्छितात. त्यामुळे , या संदर्भात कर्मबंधन आणि योग समजून घेण्याची गरज आहे. योगाचा शब्दशः अर्थ एकत्र येणे असा होतो आणि गीते मध्ये विविध संदर्भांमध्ये त्याचा वापर केला जातो. श्रीकृष्ण समतेला योग म्हणतात (2.48). हे धनंजय! तू आसक्ती सोडली पाहिजे आणि परिपूर्ण आणि अपूर्ण यांच्यात समानता राखली पाहिजे. समतेला योग म्हणतात. तसेच श्लोक 2.38 मध्ये , कृष्ण अर्जुनाला सुख-दु:ख , विजय-पराजय आणि नफा-तोटा यांची बरोबरी करून युद्धाची तयारी करण्यास प्रोत्साहित करतो. आपल्या कर्मांमुळे उमटलेले चांगले-वाईट प्रभाव किंवा ओरखडे आणि त्यातून उत्पन्न होणार्‍या अंतर्बाह्य प्रतिक्रिया यांचा कर्मबंधनामध्ये समावेश होतो. त्यांना निष्पक्ष पॅटर्न्स म्हटले पाह...

29. संतुलनच सर्वोच्च

Image
  श्लोक 2.38 गीते चे संपूर्ण सार प्रतिबिंबित करतो. श्रीकृष्ण अर्जुनला सांगतात की , जर त्याने सुख-दु:ख , नफा-हानी , विजय-पराजय समान मानून युद्ध केले तर त्याच्याकडून कोणतेही पाप होणार नाही. इथे ' समानतेचा ' संदर्भ युद्धासह आपल्या सर्व कृतींना लागू पडतो हे विशेष. हा श्लोक सांगतो की आपली सगळी कर्मे ही प्रेरित असतात आणि ही प्रेरणा आपल्या कर्माला अशुद्ध किंवा पापयुक्त बनवते. परंतु आनंद , लाभ किंवा विजय मिळविण्यासाठी किंवा दुःख , नुकसान किंवा पराजय टाळण्यासाठी प्रेरीत नसलेली कोणतीही कृती आपल्याला क्वचितच माहित असेल किंवा घडत असेल. सांख्य आणि कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून , कोणतेही कर्म तीन भागांमध्ये विभाजित करता येते , कर्ता (करणारा) , चेष्टा (कृती) आणि कर्मफळ (कृतीचा परिणाम). श्रीकृष्णा ने कर्मफळाला सुख/दु:ख ,   नफा/तोटा आणि जय/पराजय यांच्यामध्ये विभाजित केले आहे. या श्लोकात श्रीकृष्ण समता साधण्यासाठी या तिघांना वेगळे करण्याचे संकेत देत आहेत. एक मार्ग आहे कर्तापण सोडून देण्याचा (कर्तेपणाची भावना) आणि केवळ साक्षी बनण्याचा (साक्षीदार). आयुष्य नावाच्या महानाट्यात आपण केवळ क्षुल्ल...