86. कामना आणि संकल्प सोडा
प्रत्येक संस्कृतीने समाजात शांतता राखण्यासाठी ‘ हे करा आणि हे करू नका ’ विकसित केले आणि न्याय व्यवस्था विकसित झाल्यामुळे काही ‘ करू नका ’ हे दंडनीय गुन्हे बनले आहेत. गुन्हेगारी न्यायशास्त्रात , अपराधामध्ये हेतुपुरस्सर उपस्थिती आणि अंमलबजावणीच्या भूमिकेद्वारे दोषी ठरवले जाते. हेतू हा गुन्ह्यामागील कल्पना आहे आणि अंमलबजावणी ही भौतिक बाजू आहे. कोणत्याही व्यक्तीला गुन्हा सिद्ध करण्यासाठी दोन्ही घटकांचा पुरावा आवश्यक असतो. उद्देश म्हणजे संकल्प असे जर आपण गृहित धरले आणि अंमलबजावणी म्हणजे इच्छा तर आपण कृष्णाचे पुढील म्हणणे समजू शकतो. “ ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे ही काम आणि संकल्प यांच्यापासून मुक्त आहेत (काम-संकल्प-वर्जित:) ; तसेच ज्याचीकर्मे ज्ञानाच्या अग्नीत नष्ट झाली आहेत , त्याला ज्ञानी लोक ‘ पंडित ’ असे म्हणतात ” (4.19 ). एखादा व्यक्ती गुन्हा करण्याचा उद्देश मनात ठेवून वावरत असेल तरी जोपर्यंत गुन्हा घडत नाही तोपर्यंत सामान्यत समाज हा समाधानी असतो. श्रीकृष्ण म्हणतात, आपण आधी ‘कामा’चा त्याग करावा आणि नंतर संकल्पाचाही त्याग करावा. कामाचा त्याग करणे विविध कारणांमुळे शक्य होते ...