Posts

Showing posts from September, 2024

44. संतुलित निर्णय घेणे

Image
  आपण सर्वजण आपल्यासाठी , आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी विविध घटकांच्या आधारे अनेक निर्णय घेतो. श्रीकृष्ण ‘ योगः कर्मसु कौशलम् ’ म्हणजेच समतेच्या योगात प्रत्येक कृती सुसंवादी असते असे सांगून या निर्णय क्षमतेला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी प्रोत्साहित करतात (2.50). फुलाच्या सौंदर्य आणि सुगंधाप्रमाणे पसरलेल्या सुसंवादाचा अनुभव घेण्यासाठी कर्ता आणि अहंकार सोडून देणे हे आहे. कर्ता म्हणून , आमचे सर्व निर्णय स्वतःसाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आनंद मिळवण्यासाठी आणि दुःख टाळण्याच्या दिशेने निर्देशित केले जातात. प्रवासाचा पुढील स्तर म्हणजे संतुलित निर्णय घेणे , विशेषत: जेव्हा आपण संस्था आणि समाजासाठी जबाबदार असतो , तथापि , कर्ता अजूनही उपस्थित असतो. श्रीकृष्ण त्या सर्वोच्च स्तराविषयी बोलत आहेत जिथे कर्तात्वाचा त्याग केला जातो आणि अशा व्यक्तीद्वारे जे काही केले जाते ते सुसंवादी असते. सर्वव्यापी चेतना त्यांच्यासाठी कर्ता बनते. सर्व निर्णयकर्त्यांसाठी हा प्रवासातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो आणि म्हणूनच भारतीय प्रशासनिक सेवेचे घोषवाक्य हे ‘ योगः कर्मसु कौशलम ’ असे निर्धारित करण्यात आले ...

43. ‘तटस्थ’ राहणे

Image
  आपल्या जीवनाला आपल्या कृती आणि निर्णय तसेच इतरांच्या कृती चांगल्या किंवा वाईट अशी विभागण्याची सवय आहे. श्रीकृष्ण म्हणतात की समता असलेला मनुष्य या जगात पुण्य आणि पाप दोन्ही सोडतो (2.50). याचा अर्थ असा की एकदा आपण समत्व योग साधला की विभाजन/वर्गीकरण संपते. आपले मन रंगीत चष्म्यांनी झाकलेले असते जे आपल्या जन्माच्या काळात आपल्या पालकांच्या , कुटुंबाच्या आणि मित्रांच्या प्रभावाने तसेच देशाच्या कायद्याच्या प्रभावाने आपल्यावर अंकित होतात. आपण या चष्म्यातून गोष्टी/कृती पाहत राहतो आणि त्यांचे चांगले किंवा वाईट असे वर्गीकरण करतो. योगामध्ये , या चष्म्यांचे टिंट्स निघून जातात , ज्यामुळे गोष्टी स्पष्ट दिसतात , जे फांद्यांऐवजी मुळे नष्ट करणे आणि गोष्टी जसेच्या तसे स्वीकारण्यासारखे आहे. अशा विभाजने व्यावहारिक जगात आपली दृष्टी अधू होते आणि त्यामुळे योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली महत्वाची माहितीही आपल्याला मिळू शकत नाही. व्यवस्थापनाच्या भाषेत सांगायचे झाले तर अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीच्या आधारे घेतलेला कोणताही निर्णय अपयशीच ठरणार , हे नक्की. मध्यभागी असणे हे एखाद्या चर्चेसारखे असते ...

42. अहंकार टाळा

Image
  श्रीकृष्ण ने पाहिले की अर्जुन ‘ अहम कर्ता ’ म्हणजेच अहंकाराच्या भावनेने भारावून गेला होता आणि हेच त्याच्या दुःखाचे कारण होते. श्रीकृष्ण अर्जुनाला अहंकार तोडण्यासाठी आणि आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुसंगत बुद्धीचा वापर करण्याचा सल्ला देतात (2.41). अहंकाराची अनेक रूपे आहेत. गर्व हा अहंकाराचा एक छोटासा भाग आहे. जेव्हा एखादी व्यक्ती यश/विजय/नफ्याच्या आनंदाच्या ध्रुवीयतेतून जाते तेव्हा त्या अहंकाराला अभिमान म्हणतात आणि जेव्हा एखादी व्यक्ती अपयश/पराजय/ नुकसानाच्या दुःखाच्या ध्रुवतेतून जाते तेव्हा त्या अहंकाराला उदासीनता , दुःख , राग म्हणतात. जेव्हा आपण इतरांना आनंदी पाहतो तेव्हा तो मत्सर असतो आणि जेव्हा आपण इतरांना दुःखी पाहतो तेव्हा ती सहानुभूती असते. आपण भौतिक गोष्टी जमा करत असतो तेव्हा आणि जेव्हा त्यांचा त्याग करत असतो तेव्हा, अशा दोन्ही वेळेस अहंकार असतो. हा अहंकार संसारामध्ये कर्म करण्यासाठी आणि संन्यास घेण्यासाठीही प्रेरित करते. तो विनाश आणि निर्मिती अशा दोन्ही बाबींना कारणीभूत ठरतो. तो ज्ञानातही आहे आणि अज्ञानातही. स्तुतीमुळे अहंकार वाढतो आणि टीका दुखावते , ज्यामुळे आपण इत...

41. आतल्या प्रवासासाठी सुसंगत बुद्धिमत्ता

Image
  योग म्हणजे आपल्या आतील आणि बाह्य भागांचे मिलन. कर्म योग ’, ‘ भक्ती योग ’, ‘ सांख्य योग ’, ‘ बुद्धी योग ’ अशा अनेक मार्गांनी हे साध्य करता येते. एखादी व्यक्ती त्याच्या स्वभावाच्या आधारे त्याला योग्य मार्गांनी योग साधू शकते.     श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात , “ या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे , म्हणून तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे , कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यन्त दीन होते ” (2.49). त्यापूर्वी श्रीकृष्ण म्हणतो की, “ या कर्मयोगात निश्चयात्म बुद्धी एकच असते. परन्तु अस्थिर विचार असणार्‍या माणसांच्या बुद्धी पुष्कळ फाटे फुटलेल्या असतात ” ( 2.41 ). एकदा बुद्धीला सुसंगतता प्राप्त झाली की (जसे भिंग प्रकाशाला केंद्रीकृत करतो) की मग ती कोणत्याही बौद्धिक प्रवासासाठी तयार होते. अंतरात्म्याकडे होणार्‍या प्रवासासहित कोणत्याही प्रवासात दिशा आणि हालचाल अंतर्भूत असते. प्रवासाचि दिशा अंतरात्म्याकडे असणे याला श्रीकृष्ण बुद्धीयोगाशी जोडतो. सामान्यत: आपण सुंसगत बुद्धिमत्तेचा वापर बाह्य जगातील इच्छा पूर्ण करण्यासाठी करतो, मात्र आपण...

40. कर्तेपणाच्या भावनेचा त्याग

Image
  श्लोक 2.48 मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात , तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्यकर्मे कर. या समत्वालाच योग म्हणतात. दुसऱ्या प्रकारे सांगायचे झाल्यास आपण द्वंद्वाशी नाते जोडणे थांबविले की आपण जे काही करू ते सुसंगत होत जाते. आपले दैनंदिन आयुष्य म्हणजे निर्णय आणि पसंतींची एक मालिकाच असते. आपले सतत जागृत असलेले मन हे उपलब्ध पर्यायांमधून सतत काहीतरी निवडत असते आणि श्रीकृष्ण त्यांची वर्गवारी सुख-दु:ख, नफा-तोटा, जय-पराजय आणि यश-अपयश यांच्यात करतात ( 2.38 ). समत्व म्हणजे या ध्रुवांना समान मानणे , सामान्यतः त्यांना ओलांडणे असे म्हटले जाते. जेव्हा ही जाणीव गहन होते , तेव्हा मन शक्तीहीन होते आणि निवडहीन जाणीव प्राप्त होते. जेव्हा आपण झोपेत किंवा नशेत असतो तेव्हा आपण फरक करण्याची क्षमता गमावतो. पण समत्व विभाजन करण्यास सक्षम असूनही विभाजन करत नाही. हे फक्त एक निरीक्षक/ दृष्टा बनून वर्तमान क्षणात जगत आहे. कर्म करत असताना समत्व गाठण्यासाठीचा व्यावहारिक मार्ग म्हणजे कर्तेपणाची जाणिव त्यागणे आणि केवळ साक्षी बनून राहणे. एखाद्या नाटकात समरस...