Posts

Showing posts from January, 2024

2. लक्ष्य एक मार्ग अनेक

Image
“सगळे रस्ते रोमकडेच जातात” या उक्तीप्रमाणे गीतेमध्ये सांगितलेले सगळे रस्ते हे आपल्या अंतरात्म्याकडेच जातात. यातील काही मार्ग हे विरोधाभासी असल्याचे आपल्याला वाटत राहते. मात्र, हे एक चक्र आहे ज्यानुसार कोणत्याही मार्गावरील प्रवास हा आपल्याला एकाच गंतव्याकडे घेऊन जातो. श्रीमदभगवद्गीता ही वेगवेगळ्या पातळीवर कार्य करीत असते. कधीकधी श्रीकृष्ण अर्जुनाच्या पातळीवर येतो तर कधी तो परमात्म्याचे रुप धारण करतो. या दोन्ही पातळ्या भिन्न वाटत असल्याने सुरुवातीला गीतेचा अर्थ लावण्यात आणि समजून घेण्यात अडचणी येतात. मागील शतकाच्या प्रारंभी वैज्ञानिकांना प्रकाशाला समजून घेतानाही अशाच अडचणी आल्या होत्या. सुरुवातीला हे सिद्ध झाले की प्रकाश हा तरंगाप्रमाणे आहे आणि पुढील काळात समोर आले की त्यामध्ये कणांचेही गुणधर्म आहेत. या दोन्ही बाबी एकमेकांच्या विरुद्ध असल्याचे भासते. मात्र, ज्या प्रकाशाला आपण इतके चांगल्या प्रकारे सरावलो आहे तो अंतर्विरोधाने भरलेला आहे. आयुष्याचेही तसेच आहे. एकदा एक हत्ती गावात शिरला आणि काही अंध व्यक्तींनी त्या हत्तीला ओळखण्यास किंवा समजून घेण्यास प्रारंभ केला. हत्ती...

1. प्रारंभ अहंकारापासून

Image
कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनाच्या दरम्यान झालेल्या संवादावर आधारित 700 श्लोकांनी भगवद्गीतेची रचना झाली आहे. युद्धाला प्रारंभ होत असतानाच अर्जुनाच्या मनात ही भावना उत्पन्न झाली की या युद्धात त्याचे अनेक मित्र आणि नातेवाईक मारले जातील. हे युद्ध कसे वाईट आहे हे तो विविध मुद्द्यांच्या आधारे पटवून द्यायचा प्रयत्न करतो.  अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला हा संभ्रम वस्तुत: ‘मी कर्ता आहे- अहम कर्ता’ या विचारातून आला आहे आणि हा खरे तर अहंकार आहे. हाच अहंकार आपल्याला सतत सांगत राहतो की आपण कुणीतरी वेगळे आहोत, मात्र वास्तव हे वेगळेच असते. अनेकदा स्वत:बद्दलच्या अवास्तव अभिमानाला अहंकार म्हटले जाते मात्र अहंकाराची अनेक रुपे आहेत.  हा संपूर्ण संवाद हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात अहंकारावर आधारित आहे आणि त्यापासून मुक्ती मिळवण्याचे विविध मार्ग आणि उपाय श्रीकृष्ण सुचवितो.  कुरुक्षेत्र युद्धाचा रुपक म्हणून जर आपण विचार केला तर असे लक्षात येईल की आपण सगळे आपल्या दैनंदिन आयुष्यात, कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, प्रकृती, संपत्ती, नाती इत्यादींच्या स...