Posts

Showing posts from December, 2025

97. ज्ञानाची तलवार

Image
  श्रीकृष्ण म्हणतात , " ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयाचा नाश केला आहे , अशा अंत:करण स्वाधीन असलेल्या पुरुषाला कर्मे बंधनकारक होत नाहीत (4.41). त्यामुळे तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या संशयाचा विवेकज्ञानरूपेण तलवारीने नाश करून समत्वरुप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा" (4.42).   जेव्हा आपण केलेल्या किंवा न केलेल्या कृतींमुळे गोष्टी किंवा नातेसंबंध दुखावले जातात ज्यामुळे आपल्याला पश्चात्ताप होतो , तो पश्चात्ताप हा एक प्रकारचा कर्म बंधन आहे. त्याचप्रमाणे , आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम करणार्‍या इतरांच्या कृती किंवा निष्क्रियतेबद्दल आपण जी निंदा करतो ती देखील एक प्रकारचे कर्म बंधन आहे. ज्ञानाची तलवार हे एकमेव साधन आहे जे आपल्याला पश्चात्ताप आणि निषेधाच्या जटिल जाळ्यातून स्वतःला बाहेर काढण्यास मदत करू शकते. गीतेतील चौथ्या प्रकरणाचे नाव हे ‘ ज्ञान कर्म संन्यास योग ’ हे आहे. परमात्मा कसे कर्म करतो येथून त्याची सुरुवात होते आणि पुढे सगळी कर्मे आपण निस्वार्थ कृतींच्या यज्ञासारखी केली प...

96. स्वत:तील शहाणपण

Image
  एकदा निर्मात्याला असा प्रश्न पडला होता की ती बुद्धिमत्ता कोठे लपवायची जे मिळाल्यानंतर मिळविण्यासाठी काहीही राहिले नाही. त्याच्या पत्नीने त्याला ते उंच पर्वतावर किंवा खोल समुद्रात लपविण्याचा सल्ला दिला. पण या दोन्ही ठिकाणी मानव पोहोचू शकतो हे लक्षात घेऊन त्याने नकार दिला. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की आपण हे ज्ञान, हे शहाणपण माणसाच्या आतच ठेवावे. त्याला ते सापडणे अत्यंत कठीण असेल कारण तो नेहमी बाहेरच बघत असतो. हे रूपक आपल्याला समजून घेणे सोपे करते जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात , या जगात ज्ञानासारखे पवित्र काहीही नाही. योग्य वेळी , जो योगामध्ये सिद्ध होतो तो तो स्वतःमध्ये शोधतो ( 4.38). सार असा आहे की बुद्धिमत्ता आपल्यात असते आणि त्याच प्रमाणात प्रत्येकामध्ये असते. ती फक्त स्वतःमध्ये जाणवण्याची गोष्ट आहे. श्रीकृष्ण पुढे म्हणतात , श्रद्धावान आणि जितेंद्रीय व्यक्तीला ज्ञान आणि त्यातूनच पुढे त्याला भगवत्प्राप्ति रू प परमशांती लाभते (4.39). श्रीकृष्ण उलट सांगतात आणि म्हणतात , श्रद्धेशिवाय अज्ञानीचा नाश होतो आणि त्याच्यासाठी या जगात किंवा परलोक कोणतेही सुख नाही (4.40). श्रद्धा हा गीते...

95. पापाच्या महासागरासाठी शहाणपणाचा तराफा

Image
  आपण पाप करतो आहोत या भावनेतून अर्जुनाच्या मनात नैराश्य निर्माण झाले होते. त्याला असे वाटत असते की आपले शिक्षक, नातेवाईकआणि मित्रांना मारणे ( 1.36 ) हे पाप आहे आणि असे कृत्य त्याने टाळले पाहिजे ( 1.38 ) . सत्तेच्या लोभापायी तो आणि त्याचे बंधू आपल्याच भावांना मारण्याची तयारी या भावनेने तो अधिक व्यथित झाला आहे ( 1.45 ) . अर्जुनासमोर योग्य दृष्टिकोन मांडण्यासाठी श्रीकृष्ण त्याच्याशी अनेक वेळा पापांसंदर्भात बोलतो. श्रीकृष्ण म्हणतात , जरी तुम्ही सगळं पापीमध्ये सर्वात अधिक पापी असाल तरी ज्ञानाच्या नावेत तुम्ही पापाचा सागर सुरक्षितपणे पार कराल ( 4.36 ) . जशी जळती ज्वाला सरपण खाऊन टाकते , त्याचप्रमाणे ज्ञानाची अग्नी सर्व कर्मे खाऊन टाकते ( 4.37 ) . श्रीकृष्णासाठी पाप हा असा अंधार आहे, जो शहाणपणाच्या आणि जाणिवेच्या प्रकाशाने दूर होतो. अंधार बराच काळ राहू शकतो किंवा तो घनदाटही असू शकतो मात्र प्रकाशासमोर तो टिकाव धरू शकत नाही. मात्र सर्वसामान्यपणे सांगितल्या जाणार्‍या धार्मिक बाबींपेक्षा हे वेगळे आहे. पाप म्हणविल्या कृती, विचार आणि भावनांचा संबंध सामान्यत: दु:खाशी जोडला असतो. पाप केल...

94. शिकण्याची कला

Image
    आयुष्यभर शिकण्याची क्षमता ही मानवी देणगी आहे. कसे शिकायचे आणि काय शिकायचे हा मूळ प्रश्न आहे. श्रीकृष्ण म्हणतात , ज्यांना सत्य समजले आहे त्यांना साष्टांग नमस्कार करून , प्रश्न विचारून आणि सेवा केल्याने तत्वज्ञान प्राप्त होईल (4.34). साष्टांग नमस्कार म्हणजे नम्रता , विनयशीलता , इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्याची क्षमता आणि मुळात मोकळेपणाने वागणे , जी अहंकारावर मात करते. प्रश्न हे इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या फीडबॅक लूपसारखे असते जिथे आपण जे काही बोलतो किंवा करतो ते आपण का बोलले किंवा केले यावर प्रश्न पडतो. सर्व प्रश्न संपेपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवावी लागेल. सेवा करुणेतून निर्माण होते.   ज्याला जाणिव आहे असा व्यक्ती (गुरू) कोण आहे आणि त्याला कसे शोधायाचे हा पुढचा प्रश्न आहे. श्रीमदभागवतात, श्रीकृष्ण अशा व्यक्तीचा उल्लेख करतो जो म्हणतो की त्याला 24 गुरू आहेत आणि तो क्षमाशीलता पृथ्वीकडून शिकला; निष्पापता बालकाकडून; अनासक्ती हवेकडून; साठा न करणे मधमाशांपासून; समत्व सूर्यापासून; संवेदनांचे सापळे माशापासून आणि ही यादी बरीच मोठी आहे. यातून हे स्पष्ट होते की जोपर्यंत शिकण्या...