39. पुनरावृत्ती ही यशाची गुरुकिल्ली आहे
कर्ण आणि अर्जुन हे दोघेही कुंतीच्याच पोटी जन्मले होते मात्र शेवटी दोघेही एकमेकांविरोधत लढले. कर्णाला शाप मिळाला असल्याने युद्धकौशल्याबद्दलचे त्याचे ज्ञान आणि युद्धांचा अनुभव अर्जुनाविरुद्धच्या महत्वपूर्ण लढतीत उपयोगात आले नाही. तो युद्ध हरला आणि मारला गेला. ही परिस्थिती आपल्या सगळ्यांना लागू होते कारण आपण सगळे कर्णासारखे आहोत, आपण आपल्या आयुष्यातून अनेक गोष्टी शिकतो, ज्ञान आणि अनुभव प्राप्त करतो. मात्र, महत्वाच्या क्षणी पूर्ण जाणिवेने वागण्याऐवजी आपल्या अंत:प्रेरणेने विचार आणि कृती करतो आणि याचे कारण आपल्या जाणिवेची पातळी आवश्यकतेपेक्षा कमी असते. कृष्णाला याची पूर्ण जाणिव आहे आणि तो गीतेमध्ये विविध पद्धतींनी वस्तुस्थिती आणि सत्य समजावून सांगतो जेणेकरून जाणिव अधिक खोलवर होऊन आवश्यक ती पातळी गाठेल. श्रीमदभगवद्गीता म्हणते आपल्याला एक अंतरात्मा आहे आणि बाह्य शरीर आहे आणि हे नदीचे दोन काठ आहेत. सामान्यत: आपली ओळख ही आपले शरीर, आपल्या भावना, विचार आणि आपल्या भवतालचे जग यातून होत असते. श्रीकृष्ण आपल्याला सत्याची जाणीव करून घेण्यास आणि आपल्या आंतरिक व्यक्तिमत्त्वास ओळखण्यास सांगतात...