100. प्रतिक्रियेपासून सक्रियतेपर्यंत
आयुष्य हे दुतर्फा प्रक्रिया आहे. आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी घडत राहतात आणि आपण त्यांना प्रतिक्रिया देत राहतो. या संदर्भात, श्रीकृष्ण म्हणतात की , “ सांख्ययोगी तत्त्ववेत्त्याने पाहात असता , ऐकता असता , स्पर्श करीत असता , वास घेत असता , भोजन करीत असता , चालत असता , झोपत असता , श्वासोच्छ्वास करीत असता ( 5.8) , बोलत असता , टाकीत असता , घेत असता तसेच डोळ्यांची उघडझाप करीत असताही सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत , असे समजून निःसंशय असे मानावे की , मी काहीच करत नाही ” (5.9). या अस्तित्ववादी श्लोकात, श्रीकृष्ण हा सत्य जाणणार्याच्या सर्वोच्च अनुभवाचे वर्णन करीत असतो. कौतुक किंवा टीका यातून निर्माण होणार्या भावनांचा आपण नित्य अनुभव घेत असतो. गोष्टीतला कावळा जसा कोल्ह्याने त्याच्या गाण्याची केलेली स्तुती ऐकून तोंडातला मांसाचा तुकडा खाली टाकून देतो, तसेच आपलेही कौतुक ऐकून होत असते. त्याचप्रमाणे, टीकेची पातळी आणि टीकाकाराची ताकद किती आहे यानुसार आपण त्यावर मौन, बोलून किंवा शारीरिक प्रतिक्रिया देतो. आपण या प्रेरणांना खरे आणि आपल्याच आहेत असे मानतो. त्या आपण जेव्हा वैयक्तिक...