Posts

Showing posts from June, 2026

112. आपल्यातील शत्रूपासून सावधान

Image
  श्रीकृष्ण म्हणतात की व्यक्ती स्वतःच्या उद्धारासाठी आणि स्वतःला अधोगतीला आणण्यासाठी जबाबदार आहे (6.5). ही जबाबदारी पार पाडण्यासाठी श्रीकृष्ण मार्गही सांगतात, ज्या जीवात्माने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले , त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले नाही , त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो ( 6.6 ) . महत्वाचे आहे स्वत:ला जिंकून घेणे. आत्मा हा शब्द श्लोक 6.5 आणि 6.6 मध्ये बारा वेळा येतो आणि त्याच्या विविध प्रकारच्या वापरामुळे विविध अर्थही निघतात. मात्र , साधकासाठी या श्लोकांमध्ये दिलेल्या संदर्भानुसार त्याचा अर्थ हा स्वत:ला जिंकून घेणे असाच आहे. श्रीकृष्ण म्हणतात , “ थंड-उष्ण , सुख-दुःख इत्यादी तसेच मान-अपमान यांमध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो ; म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काही नसतेच ” (6.7 ). याचा अर्थ सतत विद्यमान असलेल्या द्वंद्वांच्या पल्याड जाणे असाच आहे. सुख देणार्‍या अनेक लढाया अर्जुनाने जिंकल्या होत्या. ...

111. मैत्री स्वत:शी

Image
  श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात , “ स्वतःच स्वतःचा संसारसमुद्रातून उद्धार करून ध्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये , कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे ” (6.5) . मैत्रीप्रमाणेच या अस्तित्वात्मक श्लोकालाही अनेक आयाम आहेत. सगळ्यात आधी, यामुळे स्वत:चे उन्नयन करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीवर येते. वाईट म्हणून ओळखली जाणारी कर्मे केली किंवा आपल्याला अपेक्षित कर्मफल मिळाले नाही की साधारणत: त्याचा दोष आपण इतरांवर म्हणजे कुटुंब, मित्र, सहकारी, परिस्थिती, कामाच्या ठिकाणची परिस्थिती, देश अशा बाह्य घटकांना देतो. त्यामुळे अनेकांबद्दल आपल्या मनात खोलवर कटुता निर्माण होते आणि कधी कधी तर ती आयुष्यभर टिकून राहते. दुसर्‍या बाजूला, आपल्याला अशा खुपणार्‍या बाबींचे स्मरण होते त्या त्यावेळी आपण स्वत:लाच वारंवार शिक्षा करतो. परिणाम काहीही असोत, मात्र हा श्लोक आपल्याला स्वत:चे उन्नयन करण्यास सांगतो. शरण जाणे, प्रश्न विचारणे आणि सेवा हे तीन गुण जेव्हा आपण विकसित करतो तेव्हा शिक्षक (गुरू) आपल्याला मदत करण्यासाठी प्रकट होतो याचे आश्वासन कृष्णाने आपल्याला आधीच दिले आ...

110. द्वंद्वातीतातून शांती

Image
  श्रीकृष्ण म्हणतात , “ ज्याला संन्यास असे म्हणतात , तोच योग्य आहे , असे तू समज , कारण संकल्पांचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही ” (6.2) . आधी असेही म्हटले गेले आहे की ऋषीचे प्रयत्न हे काम आणि संकल्प विरहित असतात ( कामसंकल्पवर्जिताः ) ( 4.19 ) . श्रीकृष्ण पुढे म्हणतो, “ योगावर आरुढ होण्याची इच्छा करणार्‍या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी ‘निष्काम कर्म करणे’   हाच हेतू सांगितला आहे आणि योगारुढ झाल्यावर त्या योगारुढ पुरुषाचा जो सर्व संकल्पांचा अभाव असतो , तोच कल्याणाला कारण सांगितला आहे ( 6.3 ) . ज्यावेळी इंद्रियांच्या भोगांत किंवा कर्मांतही पुरुष आसक्त होत नाही , त्यावेळी सर्व संकल्पांचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते ” ( 6.4 ) . आपण असे मानतो की इच्छित कर्मफलाच्या प्राप्तीसाठी कर्म केले जातात आणि तसे नसेल तर कुणी कशासाठी कर्म करेल? येथे हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसेल किंवा तिचा अनुभव नसेल, याचा अर्थ असा नाही की ती गोष्टच अस्तित्वात नाही. पहिले, कर्मफलांसाठी केलेल्या आपल्या पूर्वीच्या कर्मांच्या अनुभवांचे विश्...