109. संन्यास म्हणजे कर्मफळाचे त्याग
आयुष्यात अनेक चढ-उतार येतात आणि आपण ते कसे हाताळतो यावर बरेच काही अवलंबून असते. परिस्थिती खडतर असते तेव्हा तणाव आणि नैराश्य येणे स्वाभाविक असते आणि अशावेळी आपण कर्मांचा त्याग करण्याचा विचार करायला लागतो. कारण, आपण सगळे या भ्रमात असतो की आपल्या आणि इतरांच्या कर्मामुळे आपल्याला सुख किंवा दु:ख मिळते. अर्जुनदेखील द्विधा मनस्थितीत आहे आणि युद्ध लढण्याचे कर्म त्यागण्याची त्याची इच्छा आहे. श्रीकृष्ण स्पष्ट करतात , “ जो पुरुष कर्मफलाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्मे करतो, तो संन्यासी व योगी होय. आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे ; तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे ” ( 6.1 ) . कर्तव्य कर्म बद्दल अधिक वर्णन केल्यास अधिक संभ्रम निर्माण होऊ शकतो कारण ती पूर्णपणे अनुभवण्याची बाब आहे. पोहावे कसे हे शिकण्यासाठी आपल्याला पाण्यात उडी मारावी लागते आणि त्याचप्रमाणे, करायच्या कृती समजून घेण्यासाठी आयुष्याला सामोरे जावे लागते. पोहोण्यासाठी तरंगणे जसे आहे तसेच इंद्रियांचा आधार न घेता आनंदी राहणे हा आपल्या प्रगतीचा निकष आहे. बीजाच्या गर्भाचे रक्षण करण्यासाठी त्यावर आवरण असणे गर...