40. कर्तेपणाच्या भावनेचा त्याग
श्लोक 2.48 मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्यकर्मे कर. या समत्वालाच योग म्हणतात. दुसऱ्या प्रकारे सांगायचे झाल्यास आपण द्वंद्वाशी नाते जोडणे थांबविले की आपण जे काही करू ते सुसंगत होत जाते.
आपले
दैनंदिन आयुष्य म्हणजे निर्णय आणि पसंतींची एक मालिकाच असते. आपले सतत जागृत
असलेले मन हे उपलब्ध पर्यायांमधून सतत काहीतरी निवडत असते आणि श्रीकृष्ण त्यांची
वर्गवारी सुख-दु:ख, नफा-तोटा, जय-पराजय आणि यश-अपयश यांच्यात करतात (2.38).
समत्व
म्हणजे या ध्रुवांना समान मानणे, सामान्यतः त्यांना ओलांडणे असे म्हटले जाते. जेव्हा ही जाणीव गहन होते, तेव्हा मन शक्तीहीन
होते आणि निवडहीन जाणीव प्राप्त होते. जेव्हा आपण झोपेत किंवा नशेत असतो तेव्हा
आपण फरक करण्याची क्षमता गमावतो. पण समत्व विभाजन करण्यास सक्षम असूनही विभाजन करत
नाही. हे फक्त एक निरीक्षक/ दृष्टा बनून वर्तमान क्षणात जगत आहे.
कर्म
करत असताना समत्व गाठण्यासाठीचा व्यावहारिक मार्ग म्हणजे कर्तेपणाची जाणिव त्यागणे
आणि केवळ साक्षी बनून राहणे. एखाद्या नाटकात समरसतेने, झोकून देऊन, अचूकपणे आणि
पूर्ण क्षमतेने काम करणे आहे, म्हणजेच उपलब्ध स्थितीत सर्वोत्कृष्ट काम
करण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे, आयुष्याच्या मोठ्या रंगमंचावर आपल्याला विविध
भूमिका संपूर्ण समर्पणाने निभावाव्या लागतात. मग तो मुलगा/मुलगी, नवरा/बायको, पालक, मित्र, कर्मचारी, मालक, सहकारी, पर्यवेक्षक
किंवा इतर कोणताही असू शकतो. एकाच दिवसात
वेगवेगळ्या भूमिकेसाठी वेगवेगळे मुखवटे आपण चढवतो आणि प्रत्येक भूमिका निभावताना
आपले सर्वोत्कृष्ट योगदान दिले पाहिजे आणि त्याचवेळी हे ही लक्षात ठेवले पाहिजे की
आपली भूमिका ही या नाटकाचा केवळ एक भाग आहे.
जीवनात
आम्हाला मिळालेल्या सर्व भूमिकांमध्ये तुम्ही काही दिवस याचा सराव सुरू करू शकता
आणि तुमच्या आयुष्यात येणारा सुसंवाद स्वतः पाहू शकता.

Comments
Post a Comment