44. संतुलित निर्णय घेणे


 आपण सर्वजण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी विविध घटकांच्या आधारे अनेक निर्णय घेतो. श्रीकृष्ण योगः कर्मसु कौशलम्म्हणजेच समतेच्या योगात प्रत्येक कृती सुसंवादी असते असे सांगून या निर्णय क्षमतेला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी प्रोत्साहित करतात (2.50). फुलाच्या सौंदर्य आणि सुगंधाप्रमाणे पसरलेल्या सुसंवादाचा अनुभव घेण्यासाठी कर्ता आणि अहंकार सोडून देणे हे आहे.

कर्ता म्हणून, आमचे सर्व निर्णय स्वतःसाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आनंद मिळवण्यासाठी आणि दुःख टाळण्याच्या दिशेने निर्देशित केले जातात. प्रवासाचा पुढील स्तर म्हणजे संतुलित निर्णय घेणे, विशेषत: जेव्हा आपण संस्था आणि समाजासाठी जबाबदार असतो, तथापि, कर्ता अजूनही उपस्थित असतो.

श्रीकृष्ण त्या सर्वोच्च स्तराविषयी बोलत आहेत जिथे कर्तात्वाचा त्याग केला जातो आणि अशा व्यक्तीद्वारे जे काही केले जाते ते सुसंवादी असते. सर्वव्यापी चेतना त्यांच्यासाठी कर्ता बनते.

सर्व निर्णयकर्त्यांसाठी हा प्रवासातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो आणि म्हणूनच भारतीय प्रशासनिक सेवेचे घोषवाक्य हे योगः कर्मसु कौशलमअसे निर्धारित करण्यात आले आहे.

हे भावना, पूर्वग्रह आणि आठवणींनी न ओळखण्याबद्दल आहे. अशी ओळख योग्य संदर्भात तथ्य समजून घेण्याची आपली क्षमता कमी करते, ज्यामुळे चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते. एकमेकांच्या संपर्कातून निर्माण होणारे सुख-दु:खाचे ध्रुव संपर्कात येताच लवकरच केंद्रस्थानी परततात. 

कायद्याची अंमलबजावणी किंवा कोणतीही निर्णयप्रक्रिया ही काही दरवेळेस सुखद असते असे नाही. मध्यभागी स्थिर राहिल्याने आपण निर्विकारपणे कौतुक आणि टीका दोन्हींचा स्वीकार करू शकतो.

असे संतुलित अवस्थेत, मध्यभागी उभे राहणार्‍यांमध्ये अमर्यादित बुद्धिमत्ता, ऊर्जा आणि सहानुभूती निर्माण होण्याची शक्यता असते. अशा क्षमतांनी युक्त असलेली व्यक्ती अगदी भौतिक जगाच्या निकषांनी बघितले तरीही इतरांनी निश्चितपणे मात देऊ शकते. पृथ्वीवर जीवन विकसित होऊ शकते कारण ते मध्यभागी उभे आहे (सूर्यापासून फार दूर नाही, फार जवळही नाही) आणि त्यामुंळेच आपल्याला जीवनदायी पाणी हे द्रवस्वरूपात प्राप्त होऊ शकते.

Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही