85. कर्म, अकर्म आणि विकर्म
'ऍक्ट ऑफ कमिशन अंड ओमिशन' हा सामान्यतः कायदेशीर परिभाषेत वापरला जाणारा
वाक्यांश आहे. चालकाने योग्य वेळी ब्रेक न लावल्याने हा अपघात झाला. त्याची ही ओमिशनची
किंवा अकर्माची कृती अपघाताच्या कर्माकडे जाते.
उदाहरणार्थ, कोणतीही कृती
करत असताना, आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांपैकी एक
निवडतो. जेव्हा आपण यापैकी एक पर्याय वापरून कार्य करतो, तेव्हा इतर सर्व पर्याय आपल्यासाठी
अकर्म बनतात, त्यातून प्रत्येक
कृतीमध्ये अकर्म दडलेले असते असा निष्कर्ष
निघतो.
ही उदाहरणे आपल्याला श्रीकृष्णाचे
गहन विधान समजण्यास मदत करतात की "जो पुरुष
कर्मामध्ये अकर्म पाहील आणि अकर्मामध्ये कर्म पाहील, तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा
आहे" (4.18).
श्रीकृष्ण म्हणतात की, "कर्म
काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान पुरुषही संभ्रमात
पडतात" (4.16). ते पुढे म्हणतात की,
"कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच
विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण
आहे" (4.17).
एकदा
एका विचारी व्यक्तीने एका प्राण्याला जंगलात पळत जाताना बघितले. थोड्या वेळाने एक कसाई
आला आणि त्याने एखाद्या प्राण्याला बघितले का असे विचारू लागला. या प्रश्नामुळे तो
व्यक्ती संभ्रमात पडला. खरे बोलावे तर प्राणी मारला जाईल आणि खोटे बोलणे म्हणजे
अयोग्य बाब. जगातल्या सर्व संस्कृती आणि सर्व धर्मांमध्ये निषिद्ध असलेल्या गोष्टी
जर आपण एकत्र केल्या तर आपले जगणे अशक्य होईल. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की हे
मुद्दे अत्यंत गुंतागुंतीचे आहेत आणि ज्ञानी माणसे देखील संभ्रमित होतात.
आयुष्यात असे संभ्रमित करणारे अनेक प्रसंग येतात आणि आपण जगत असलेल्या भौतिक स्तरावर त्यांची उत्तरे मिळत नाहीत. आपण जेव्हा कर्त्याऐवजी साक्षी होतो आणि पर्यायविहीन जागृत मनोवस्थेत जगायला लागतो तेव्हा हा संभ्रम दूर होतो.

Comments
Post a Comment