86. कामना आणि संकल्प सोडा

 

प्रत्येक संस्कृतीने समाजात शांतता राखण्यासाठी हे करा आणि हे करू नकाविकसित केले आणि न्याय व्यवस्था विकसित झाल्यामुळे काही करू नकाहे दंडनीय गुन्हे बनले आहेत. गुन्हेगारी न्यायशास्त्रात, अपराधामध्ये हेतुपुरस्सर उपस्थिती आणि अंमलबजावणीच्या भूमिकेद्वारे दोषी ठरवले जाते. हेतू हा गुन्ह्यामागील कल्पना आहे आणि अंमलबजावणी ही भौतिक बाजू आहे. कोणत्याही व्यक्तीला गुन्हा सिद्ध करण्यासाठी दोन्ही घटकांचा पुरावा आवश्यक असतो.

उद्देश म्हणजे संकल्प असे जर आपण गृहित धरले आणि अंमलबजावणी म्हणजे इच्छा तर आपण कृष्णाचे पुढील म्हणणे समजू शकतो. ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे ही काम आणि संकल्प यांच्यापासून मुक्त आहेत (काम-संकल्प-वर्जित:); तसेच ज्याचीकर्मे ज्ञानाच्या अग्नीत नष्ट झाली आहेत, त्याला ज्ञानी लोक पंडितअसे म्हणतात” (4.19).

एखादा व्यक्ती गुन्हा करण्याचा उद्देश मनात ठेवून वावरत असेल तरी जोपर्यंत गुन्हा घडत नाही तोपर्यंत सामान्यत समाज हा समाधानी असतो. श्रीकृष्ण म्हणतात, आपण आधी ‘कामा’चा त्याग करावा आणि नंतर संकल्पाचाही त्याग करावा.

कामाचा त्याग करणे विविध कारणांमुळे शक्य होते ज्यामध्ये कायद्याची भीती, संसाधने उपलब्ध नसणे किंवा आपली कीर्ती सांभाळणे अशा कारणांचा समावेश होतो. मात्र संकल्प हा आणखी खोलवर असतो आणि जोपर्यंत तो अस्तित्वात आहे, तोपर्यंत त्याचे रुपांतर कोणत्याही नाजूक क्षणी कामात होऊ शकते. म्हणून श्रीकृष्ण आपल्याला केवळ काम नव्हे तर संकल्पाचाही त्याग करण्यास सांगतात. तोच सर्व इच्छांचा मालक आणि चालक आहे.

आपल्याला लहानपणापासूनच वारंवार सांगितले जाते की शैक्षणिक, आर्थिक तसेच वैयक्तिक विकास साधण्याचा आपला दृढनिश्चय आणि इच्छा असली पाहिजे, ज्यामुळे हे अस्तित्वातील सत्य समजून घेण्यासाठी आपली प्रगती कठीण होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की इच्छा ही एक इच्छा असते, मग ती महान असो वा कनिष्ठ.

जेव्हा काम आणि संकल्प गळून पडतात, तेव्हा निश्चल समाधीची स्थिती प्राप्त होते आणि ही अवस्था सगळ्या प्रकारचे गुंतणे, भीती आणि राग यांपासून मुक्त असते. अशा स्थितीत केल्या जाणार्‍या कृती या जळून नष्ट होतात आणि जागरूक अवस्थेमुळे पवित्र होतात.


Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही