99.कर्म नव्हे, द्वेष सोडा

 

अज्ञानामुळे व्यक्ती भौतिक गोष्टी जमवत जातो आणि त्यातून कर्मबंधनात अडकत जातो. जागृतीचे पहिले किरण जेव्हा त्याच्या आयुष्यात येतात, तेव्हा अर्जुनाप्रमाणेच ती व्यक्ती परित्यागाचा विचार करायला लागते. मात्र, त्याग नेमका कशाचा करायचा याबाबत संभ्रम असतो. साधारणत: सर्व कर्मे आणि कृतींचा त्याग केला जातो कारण आपण त्यांना आपल्याच मनाने चांगले किंवा वाईट ठरवत असतो. आणि त्यामुले, नको असलेल्या कर्मांचा त्याग करण्याकडे आपला कल असतो.

दुसरीकडे, श्रीकृष्ण संन्यासाच्या संदर्भात एक वेगळी संकल्पना मांडतात आणि म्हणतात, "जो पुरुष कोणाचा द्वेष करीत नाही अनिकषाची अपेक्षा करीत नाही, तो कर्मयोगी नित्यसंन्यासी समजावा. कारण राग-द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला पुरुष सुखाने संसारबंधनातून मुक्त होतो (5.3). ज्या गोष्टीचा आपण सगळ्यात पहिले त्याग केला पाहिजे ती म्हणजे द्वेष होय. आपला धर्म, जात किंवा राष्ट्रीयत्व किंवा इतर कोणत्याही आपल्या मान्यतेनुसार नसलेल्या गोष्टी, या कशांबद्दलचाहि द्वेष असू शकतो. आपला व्यवसाय, लोक किंवा अवतीभवती घडणार्‍या गोष्टी यांपैकी कशाचाही द्वेष असू शकतो. वरवर भासणार्‍या विरोधाभासांमध्ये एकत्व बघणे महत्वाचे आहे. नित्यसंन्यासी हा इच्छांबरोबरच द्वेषाचाही त्याग करतो.

श्रीकृष्ण आपल्याला द्वेष किंवा इच्छा यांसारख्या गोष्टींचा त्याग करण्याचा सल्ला देतो. खरे पाहता कर्मांचा पूर्णपणे परित्याग करणे कधीही शक्य नसते कारण एकाचा त्याग केला की आपल्या गुणांच्या प्रभावामुळे आपण दुसर्‍या कर्माला प्रारंभ करतो. म्हणून आपण आपल्या बाह्य कर्मांमध्ये न राहता आपल्यात राहणारी विभागणी सोडून दिली पाहिजे.

श्रीकृष्ण पुढे म्हणतात की,ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते; तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत, असे पाहतो तोच खर्‍या अर्थाने पाहतो (5.5). कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणार्‍या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. आणि भगवत्स्वरुपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो(5.6).

आपल्यात किती द्वेष आणि इच्छा आहेत हे मोजण्याचे मापक म्हणजे कर्म आहेत. त्यामुळे, श्रीकृष्ण कर्मांचा त्याग करण्यापेक्षा निरुद्देशपणे ती करत राहण्याचा सल्ला देतात.


Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही