37. तोच अर्जुन, तोच बाण
एखादा यशस्वी आणि सक्षम व्यक्ती
एखाद्या कामात अपयशी ठरतो तेव्हा त्या परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी 'तोच अर्जुन, तोच बाण' असा वाक्प्रचार
वापरला जातो.
योद्धा
या नात्याने अर्जुन कधीही युद्ध हरला नाही. त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात, तो एक छोटीशी
लढाई हरला ज्यामध्ये त्याला डाकूंच्या गटापासून काही कुटुंबातील सदस्यांना वाचवावे
लागले. तो आपल्या भावाला परिस्थिती समजावून सांगतो आणि म्हणतो, “काय झाले ते मला
माहीत नाही. मी तोच अर्जुन आहे आणि हे तेच बाण होते ज्यांनी कुरुक्षेत्र युद्ध
जिंकले होते, परंतु यावेळी माझ्या बाणांना त्यांचे लक्ष्य सापडले नाही आणि ताकदही
नव्हती”. त्याने
सांगितले की त्याला पळून जावे लागले आणि ते कुटुंबाचे रक्षण करू शकले नाहीत.
आयुष्याच्या
अनुभवावरून हे सांगता येतं की असं आपल्यापैकी कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. अनेकदा एखादा प्रतिभाशाली खेळाडू काहीकाळासाठी
आपला फॉर्म गमाऊ शकतो. एखादा अभिनेता, गायक
अयशस्वी ठरू शकतो. याचा दोष आपण भाग्याला, वाईट काळाला देतो आणि असे का करतो हे
कुणाला कळत नाही. अंदाज आणि अदमास याशिवाय याला कोणतेही वैज्ञानिक स्पष्टीकरण नाही.
या
संदर्भात, कर्म आणि कर्मफल
यांच्यातील संबंध स्पष्ट करताना, श्रीकृष्ण म्हणतात की दैवम हा कर्माच्या पूर्ततेसाठी योगदान देणारा एक
घटक आहे (18.14). दैवम हा एक प्रकारचा विशेष गुण आहे आणि तो प्रकट जागतिक
दृष्टिकोनातून अज्ञात आहे. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु कर्मफलांवर आपला काहीही अधिकार नाही.
हस्तसामुद्रिक,
भविष्य आणि राशीभविष्य यांचा नेहमी उपयोग केला जातो मात्र त्यापैकी एकही गोष्ट ही
दैव नाही. त्याप्रमाणे, दैवाचा प्रत्यक्षात अंदाज लावता येईल असा एकही वैज्ञानिक
सिद्धांत नाही.
श्रीकृष्ण
म्हणतात की आपण फक्त एक साधन आहोत, सर्वशक्तिमानाच्या भव्य निर्मितीचा एक छोटासा भाग आहोत (11.33). यश
मिळाल्यावर आपण अहंकार निर्माण होऊ दिला नाही तर अपयश आपल्याला दुखावणार नाही, कारण दोघांचाही
दैवमवर परिणाम होतो.

Comments
Post a Comment