35. ‘कर्मयोग’ हा जगण्याचा मार्ग
श्रीकृष्ण म्हणतात की, आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु कर्मफलांवर आपला काहीही अधिकार नाही
(2.47). जर
आपल्या जवळच्या कुणावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तर आपण एखाद्या चांगल्या
शल्यविशारदाशी संपर्क साधू. त्याच्या कौशल्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये नक्कीच यश
मिळेल आणि त्याच्या चांगल्या चारित्र्यामुळे तो अनावश्यक शस्त्रक्रिया करणार नाही.
थोडक्यात आपण अशा एका शल्यविशारदाच्या शोधात आहोत जो कर्मयोगी आहे. या स्थितीतील
दोन संदेश आपल्याला हा श्लोक चांगल्याप्रकारे समजण्यास मदत करू शकतात.
आपल्याला
सेवा देणारे सगळे कर्मयोगी असावेत आणि त्यांनी आपल्याला सर्वोत्तम सेवा द्यावी अशी
आपली अपेक्षा असते. हेच तत्त्व जर आपण आपल्यासाठीच्या समत्वाला लावले तर आपणदेखील
इतरांना दैनंदिन सेवा पुरवताना कर्मयोगी होऊ
शकू.
हा श्लोक आपल्याला सांगतो की आपण जे काही
करू त्यात सर्वोत्तम काम करू, मग ते काम असो की घरगुती बाबी.
श्रीकृष्ण
गीतेमध्ये इतरत्र आपल्याला खात्री देतात की कर्मयोगाच्या सरावातील लहान लहान
गोष्टी आपल्याला समत्वाच्या अधिक जवळ आणतात, ज्यातून खरा आनंद मिळू शकतो. जेव्हा
आपण एखाद्याला पुन्हा कधीही भेटणार नाही अशी खात्री असतानाही जेव्हा सर्वोत्तम
सेवा देऊ शकतो, आपण कर्मयोगी बनंण्याच्या मार्गावर आहोत हे समजून घ्यावे.
कर्मफलाची
चिंता न करता आपण जेव्हा कर्मामध्ये पूर्णपणे गुंतलो असतो तेव्हा आपण कालातीत
अवस्थेत प्रवेश करतो जेथे काळ हा संदर्भहीन आहे. आपण जेव्हा ऑपरेशन थिएटरबाहेर वाट
बघत असतो, वेळ अगदी संथगतीने पुढे सरकत आहे असे वाटायला लागते. दुसर्या बाजूला,
कर्मयोगी शल्यविशारद आपल्या कामात वेळेचे भानही विसरून गेला असतो आणि जणू काही काळ
त्याच्यासाठी एका जागी थांबलेला असतो.
श्रीकृष्ण
आपल्याला दु:खाचे झाड समूळ उपटून काढायला सांगतात, ज्याची मूळे म्हणजे दुसरे तिसरे
काही नसून कर्मफलाची इच्छा असणे हीच आहेत.

Comments
Post a Comment