69. अभिनेता आणि प्रेक्षकही

 

आपल्या दैनंदिन जीवनात आपण आपल्या आवडीच्या काही कृतींशी संलग्न होतो, ज्याचे वर्णन 'आसक्ती' असे केले जाते किंवा आपल्या द्वेषामुळे आपण काही कृतींपासून दूर जातो, ज्याचे वर्णन 'विरक्ती' असे केले जाते. परंतु, श्रीकृष्णाने तिसर्‍या अवस्थेचा उल्लेख केला आहे, ज्याला अनाशक्तीम्हणतात, जी आसक्ती आणि विरक्ती पलीकडे आहे. ते म्हणतात, “जसा अज्ञानी माणूस कृतीत गुंतलेला असतो, त्याचप्रमाणे लोक एकत्र करू इच्छिणार्‍या अनासक्त विद्वानानेही तसे वागावे(3.25).

आसक्ती आणि विरक्ती अशा दोन्हींमधून केलेल्या कृतीमुळे आपल्याला दु:ख भोगावे लागू शकते. प्रिय व्यक्ती (आसक्ती) समोर असेल तर आपल्याला आनंद होतो आणि ती तशी नसेल तर आपण दु:खी होतो. त्याचप्रमाणे, जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही (विरक्ती) ती समोर असेल तर आपण दु:खी होतो आणि ते नसतील तर आपल्याला दिलासा मिळतो. त्यामुळे, आसक्ती आणि विरक्ती या दोन्हींमुळे आपण आनंद आणि दु:ख या दोन टोकांमध्ये हिंदकळत राहतो. श्रीकृष्ण आपल्याला  या दोन्हींच्या  पल्याड जाण्याचा सल्ला देतो आणि कृती करताना अनासक्त होण्यास सांगतो.

अनाशक्तीने वागल्यावर निर्माण होणारी करुणा म्हणजे जगाचे कल्याण समजू शकते. जेव्हा कर्म आसक्तीने किंवा विरक्तीने केले जाते, तेव्हा ते कचऱ्याच्या ट्रकसारखे असते जे सर्वत्र घाण पसरवते आणि समाजाचे नुकसान करते.

अनासक्त असणे म्हणजे नाटकात भूमिका साकारणे आणि त्याच वेळी श्रोत्यांचा एक भाग होणे आहे. मिळालेल्या भूमिकेत स्वत:ला संपूर्ण क्षमतेने झोकून देणे हे एका कलाकाराकडून अपेक्षित असते. त्याकरिता संबंधित कार्यक्षेत्राने स्वतःचे कौशल्यांमध्ये वृद्धी करणे आणि ज्ञान वाढविणे अपेक्षित असते. हे करीत असतानाच व्यक्तीने प्रेक्षागृहातील प्रेक्षकांमध्ये बसून नाट्य बघणेही आवश्यक असते. अभिनेत्याचा भाग हा बाह्य जगाप्रती आपले कर्तव्य आहे, तर प्रेक्षकाचा भाग आपल्या अंतर्मनासाठी आहे. गुणातूनच काम करण्याची प्रेरणा मिळते. कृती करताना अलिप्तपणाचा सराव केला पाहिजे या जाणिवेने की जेव्हा आपण या प्रक्रियेमध्ये प्रभुत्व मिळवू तेव्हा आपल्याला गीतेची अंमलबजावणी झाली आहे हे समजू शकते.

Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा