94. शिकण्याची कला
आयुष्यभर शिकण्याची क्षमता ही मानवी
देणगी आहे. कसे शिकायचे आणि काय शिकायचे हा मूळ प्रश्न आहे. श्रीकृष्ण म्हणतात, ज्यांना सत्य समजले आहे त्यांना साष्टांग
नमस्कार करून, प्रश्न विचारून
आणि सेवा केल्याने तत्वज्ञान प्राप्त होईल (4.34).
साष्टांग नमस्कार म्हणजे नम्रता, विनयशीलता, इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्याची क्षमता आणि मुळात मोकळेपणाने वागणे, जी अहंकारावर मात करते. प्रश्न हे इलेक्ट्रॉनिक
सर्किटच्या फीडबॅक लूपसारखे असते जिथे आपण जे काही बोलतो किंवा करतो ते आपण का
बोलले किंवा केले यावर प्रश्न पडतो. सर्व प्रश्न संपेपर्यंत ही प्रक्रिया सुरू
ठेवावी लागेल. सेवा करुणेतून निर्माण होते.
ज्याला
जाणिव आहे असा व्यक्ती (गुरू) कोण आहे आणि त्याला कसे शोधायाचे हा पुढचा प्रश्न
आहे. श्रीमदभागवतात, श्रीकृष्ण अशा व्यक्तीचा उल्लेख करतो जो म्हणतो की त्याला 24 गुरू आहेत आणि
तो क्षमाशीलता पृथ्वीकडून शिकला; निष्पापता बालकाकडून; अनासक्ती हवेकडून; साठा न
करणे मधमाशांपासून; समत्व सूर्यापासून; संवेदनांचे सापळे माशापासून आणि ही यादी
बरीच मोठी आहे. यातून हे स्पष्ट होते की जोपर्यंत शिकण्याच्या तीन बाबी आपल्यात
कायम आहेत तोपर्यंत गुरू आपल्या भवताल आहेच.
'काय शिकायचे' याविषयी श्रीकृष्ण सांगतात की, जे जाणून घेतल्याने तुम्ही पुन्हा अशा प्रकारे गोंधळून जाणार नाही, ज्यामुळे तुम्हाला सर्व जीव आणि मी ही स्वतःमधे दिसेल
(4.35). या श्लोकात 'त्याला' जाणण्याचाही
उल्लेख केला आहे, ज्याला जाणून
घेतल्यावर शिकण्यासाठी आता काही उरले नाही. निश्चयपणाने, याचा अर्थ जगातील सगळी पुस्तके वाचणे असा नाही. श्रीकृष्ण हे सोपे करतात जेव्हा ते म्हणतात की
ते 'ते' आहे ज्याद्वारे
आपण सर्व प्राणी आणि देव स्वतःमध्ये पाहू शकू.
आपण
स्वत:तील चांगल्या बाबींचा आणि इतरांच्या चुकांचा गवगवा करीत असतो. हा श्लोक असेही
सांगतो की याचप्रकारे आपण हेही समजून घेतले पाहिजे की आपल्यातही चुका आहेत आणि
इतरांमध्येही चांगल्या गोष्टी असतात. अंतिमत: भगवंत सगळीकडे आहे. एकदा ही सोपी
गोष्ट समजून घेतली की मग संभ्रमाला जागा उरत नाही.

Comments
Post a Comment