97. ज्ञानाची तलवार
श्रीकृष्ण
म्हणतात,
"ज्याने
कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने
सर्व संशयाचा नाश केला आहे, अशा अंत:करण स्वाधीन असलेल्या पुरुषाला कर्मे बंधनकारक होत नाहीत
(4.41). त्यामुळे तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या संशयाचा
विवेकज्ञानरूपेण तलवारीने नाश करून समत्वरुप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला
उभा राहा" (4.42).
जेव्हा
आपण केलेल्या किंवा न केलेल्या कृतींमुळे गोष्टी किंवा नातेसंबंध दुखावले जातात
ज्यामुळे आपल्याला पश्चात्ताप होतो, तो पश्चात्ताप हा एक प्रकारचा कर्म बंधन आहे. त्याचप्रमाणे, आपल्या जीवनावर
नकारात्मक परिणाम करणार्या इतरांच्या कृती किंवा निष्क्रियतेबद्दल आपण जी निंदा
करतो ती देखील एक प्रकारचे कर्म बंधन आहे. ज्ञानाची तलवार हे एकमेव साधन आहे जे
आपल्याला पश्चात्ताप आणि निषेधाच्या जटिल जाळ्यातून स्वतःला बाहेर काढण्यास मदत
करू शकते.
गीतेतील
चौथ्या प्रकरणाचे नाव हे ‘ज्ञान
कर्म संन्यास योग’ हे आहे. परमात्मा कसे कर्म करतो येथून त्याची सुरुवात होते आणि पुढे
सगळी कर्मे आपण निस्वार्थ कृतींच्या यज्ञासारखी केली पाहिजे असे सांगितले आहे. अशा
प्रकारे केलेली सर्व कर्मे ज्ञानात रुपांतरित होतात असे श्रीकृष्ण सांगतात (4.33).
शीर्षकामधील ‘ज्ञान’ याचा अर्थ
बुद्धिमत्ता किंवा जागृती असा आहे. याचा अर्थ असा की संन्यास म्हणजे आपली कर्मे जाणिवेने करणे आहे. संन्यास
हा ऐहिक गोष्टींचा किंवा व्यवसायांचा त्याग करून जबाबदारी टाळण्याचा किंवा पळून
जाण्याचा मार्ग नाही. श्रीकृष्णासाठी, संन्यासाचा अर्थ असा आहे की आपण अस्तित्वाने आपल्याला नेमून दिलेली
कार्ये जाणीव आणि बुद्धीने आपल्या क्षमतेनुसार पार पाडली पाहिजेत. खरं तर, सुटका नाही कारण
शांततेसाठी आवश्यक ज्ञान आपल्यामध्ये आहे, शोधण्याची वाट पाहत आहे.
जेव्हा आपण ज्ञान आणि जाणिवेने परिपूर्ण होतो, तेव्हा नर्कदेखोल स्वर्गासमान भासतो. याच्या अगदी उलट अज्ञानामुळे स्वर्गाचाही नर्क होऊ शकतो. अंतर्गत बदल हीच खरी गुरुकिल्ली आहे.

Comments
Post a Comment