105. शाश्वत आनंद
श्रीकृष्ण
म्हणतात की जे परमात्मामधे स्थिर झालेय,
ज्यांना दैवी ज्ञानाची समज आली आहे आणि ते कोणत्याही संभ्रमात नाहीत, असे व्यक्ती
काही प्रिय प्राप्त झाले तरी आनंदित होत नाहीत किंवा अप्रिय प्राप्तीमुळे उद्विग्न होत नाहीत (5.20). आपण परिस्थिती आणि लोकांची सुखद आणि अप्रिय अशी विभागणी करतो आणि
शहाणा माणूस ही विभागणी सोडून देतो.
आपले
काय आहे आणि काय नाही याबद्दलच्या चुकीच्या आकलनामुळे निर्माण होणार्या मोहापासून
दूर जाण्याचा सल्ला श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार देतो. आपण आपल्या इंद्रियांच्या
माध्यमातून सुख मिळवू शकतो हा आपला सगळ्यांत मोठा संभ्रम आहे. दुसर्या बाजूला श्रीकृष्ण
जेव्हा म्हणतात की ज्याच्या अंत:करणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते असा साधक
आत्म्यात असलेल्या, ध्यानामुळे मिळणार्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. योगाद्वारे
भगवंताशी जोडले गेल्याने ते शाश्वत आनंद अनुभवतात (5.21).
श्रीकृष्ण सावध करतात की सांसारिक
वस्तूंच्या संपर्कातून निर्माण होणारे सुख जरी सांसारिक लोकांना आनंददायी वाटत
असले तरी प्रत्यक्षात ते दुःखाचे मूळ आहे. अशा सुखांना सुरुवात आणि शेवट असतो, म्हणून ज्ञानी लोक त्यांच्याशी आनंदी नसतात
(5.22).
गीतेच्या
प्रारंभी श्रीकृष्ण म्हणतात, इंद्रिये आणि बाह्य गोष्टी एकत्र आल्या की सुख आणि
दु:खाचे द्वंद्व तयार होते आणि ते अनित्य/ क्षणिक असल्याने ते सहन करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे
(2.14). यातून हे स्पष्ट
होते की सुख आणि दु:ख हे दोन्ही एक दिवस संपणार आहेच. जेव्हा सुख संपते किंवा
आपल्याला त्याचा कंटाळा येतो तेव्हा आपल्याला दु:ख जाणवते. त्याचप्रमाणे, जेव्हा
दु:ख संपते तेव्हा आपल्याला सुखाचा अनुभव येतो. यावर मात करण्यासाठी सुखाच्या
क्षणांचा रवंथ करीत बसतो किंवा मग दोषारोप करीत बसतो. मात्र, आपण हे समजून घेतले
पाहिजे की खरे शहाणपण हे आपण अनुभवत
असताना सुखची
किंवा दु:खाची तात्कालिकता जाणून घेण्यात आहे.

Comments
Post a Comment