107. आनंदासाठी ध्यान
पीनियल ग्रंथी हा वाटण्या एवढा पाइन शंकूच्या आकाराचा अवयव
आहे जो मेंदूच्या मध्यभागी, थेट दोन भुवयांच्या मध्यभागांच्या असतो. शारीरिकदृष्ट्या ते मेलाटोनिन आणि सेरोटोनिन हे न्यूरोट्रांसमीटर
तयार करते जे अनुक्रमे झोपेच्या चक्रासाठी व मूडसाठी जबाबदार असतात. याला तिसरा डोळा असेही
म्हणतात कारण त्यात सामान्य डोळ्याप्रमाणे फोटोरिसेप्टर्स असतात.
प्रत्येक
संस्कृतीत या जागेचे विविध प्रकारे आत्म्याची जागा म्हणून वर्णन केले आहे. ही जागा
आपल्यातील आध्यात्मिक उन्नतीसाठी जबाबदार आहे. आपल्या पाच इंद्रियांपलीकडील ही
सहावी संवेदना आहे. आध्यात्मिक जागरणाचे चिन्ह आहे. भौतिक आणि आध्यात्मिक जगाला
जोडणारा दुवा आहे. भारतामधे,
भुवयांच्यामधील या जागेला आज्ञाचक्र असे म्हणतात.
ही
पार्श्वभूमी समजून घेतल्यामुळे इंद्रिये आणि मनावर नियंत्रण ठेवण्याची
श्रीकृष्णाची पद्धत आपल्याला कळून येईल. “बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता
ते बाहेरच ठेवून,दृष्टी
भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान सम करून ज्याने इंद्रिये, मन व बुद्धी
जिंकली आहेत, असा मोक्षतत्पर मुनी इच्छा, भय आणि क्रोध यांनी रहित झाला की, तो सदोदित मुक्तच असतो" (5.27-5.28). आपली इंद्रिये, मन आणि बुध्दी
नियंत्रित करण्यासाठी भगवंत अर्जुनाला ही पद्धत किंवा तंत्र सांगतो.
विज्ञान
भैरव तंत्रामध्ये भगवान शिवाने अशा 112 पद्धती सांगितल्या आहेत. त्यातील
एकापद्धतीनुसार, भुवयांच्यामधील एका बिंदूवर मनात कोणतेही विचार न आणता लक्ष
केंद्रित करा. यातून दैवी
ऊर्जा बाहेर पडते आणि डोक्याच्या मुकुटापर्यंत उठते आणि लगेचच त्या व्यक्तीला
त्याच्या आनंदाने पूर्णपणे भरते.
दुखापतग्रस्त भागांकडे आपले लक्ष वेधण्यासाठी वेदना हे एक स्वयंचलित साधन आहे आणि ते आपल्याला जगण्यास मदत करते. त्याचप्रमाणे, पीनियल ग्रंथी कार्यान्वित करण्यासाठी भुवयांच्या दरम्यानच्या भागाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागते आणि हे सक्रियकरण आपल्याला कोणत्याही इंद्रियाच्या मदतीशिवाय आंतरिक आनंदाने भरून टाकते.

Comments
Post a Comment