18. ‘सत’ आणि ‘असत’
श्रीकृष्ण
म्हणतात, सत कधी (सत्य/कायम) संपत नाही आणि असत (असत्य/क्षणिक) अस्तित्वातच नसते.
या दोन्ही मधला फरक ओळखू शकतो तो ज्ञानी असतो (2.16).
सत
आणि असत यांच्यातील फरक दाखवून देण्यासाठी अनेक संस्कृतींमध्ये दोरी आणि साप यांचे
उदाहरण देण्यात येते. एक मनुष्य सायंकाळी आपल्या घरी परतला आणि प्रवेशद्वारापाशी
त्याला एक साप गुंडाळी करून बसलेला दिसला. प्रत्यक्षात त्याच्या मुलांनी खेळता
खेळता सोडून दिलेली ती एक दोरी होती मात्र, सायंकाळच्या अंधुक प्रकाशात त्याला तो
साप वाटला. येथे दोरी हे सतचे तर साप हे असतचे प्रतिक आहे. जोपर्यंत तो सत, उदाहरणार्थ दोरी, काय आहे हे जाणून घेत नाही,
तोपर्यंत तो असतला- येथे काल्पनिक साप- कसे हाताळावे याचाच विचार आणि कृती करत राहील.
तो त्याला काठीने मारेल, पळून जाईल किंवा खरे काय हे जाणून घेण्यासाठी तो
विजेरीच्या प्रकाशाचा झोत त्यावर टाकेल. आपले आकलन जेव्हा असत असते तेव्हा
उत्तमातील उत्तम योजना आणि कौशल्ये वाया जातात. असतचा जन्म सतमधूनच होतो, जसे
दोरीशिवाय साप अस्तित्वात असूच शकत नाही. सतमुळेच
असतचे अस्तित्व असल्याने, ते आपल्याला दु:स्वप्नासारखे भासू शकते आणि त्यामुळे
आपल्या शरीराला झोपेत घाम फुटावा तसे होऊ शकते.
असतचा
शोध घेण्यासाठी श्रीकृष्णानेच एक कसोटी घालून दिली आहे. ती अशी की, असत हे
भूतकाळात अस्तित्वात नव्हते आणि भविष्यात ते असणार नाही. भौतिक सुखांचे उदाहरण
घेऊया. ती पूर्वी अस्तित्वात नव्हती आणि भविष्यातही राहणार नाहीत. तेच दु:खाचे
किंवा सर्वच द्वंद्वांचे आहे. यातून सूचित हे होते की असत हे काळावर अवलंबून असते
तर सत हे शाश्वत आहे.
सत हा अंतरात्मा आहे, जो शाश्वत आहे
आणि अहंकार हे असत आहे जे अंतरात्म्याच्या आधाराने टिकून असते. ज्या दिवशी आपण
आपल्या अंतरात्म्याला (दोरी) ओळखू शकू, त्यादिवशी
अहंकार (साप) आपोआप नाश पावेल.

Comments
Post a Comment