20. मृत्यू आपल्याला मारत नाही

 

श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, असा कोणताही काळ, भूतकाळ, वर्तमान किंवा भविष्य नाही, जेव्हा तू, मी आणि रणांगणावर उपस्थित असलेले हे राजे लोक नव्हते, किंवा नसतील (2.12). ते पुढे म्हणतात की जे शाश्वत अस्तित्व अविनाशी आहे, त्याचे भौतिक पैलू नष्ट होणे निश्चित आहे आणि म्हणूनच पुढील लढाई लढली पाहिजे. हे शाश्वत अस्तित्व आत्मा किंवा चेतना इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. त्यालाच श्रीकृष्ण देही म्हणतात.

निर्मितीच्या गाभ्यापासून श्रीकृष्ण प्रारंभ करतात आणि जीवाबद्दल बोलतात, असा जीव जो अविनाशी आहे, जो मोजता येत नाही, सर्वांना व्यापून आहे आणि शाश्वत आहे. दुसरे, याच शाश्वत जीवाला भौतिक बाजू आहे जी निश्चितपणे नष्ट होणार आहे. श्रीकृष्ण जेव्हा राज्यकर्त्यांबद्दल बोलतात तेव्हा ते त्यांच्यातील जीवित बाबीबद्दल बोलतात जी अविनाशी आहे आणि शाश्वत आहे.

आपण सगळेच दोन भागांचे बनलो आहोत. पहिला भाग म्हणजे शरीर आणि मन जे निश्चितपणे नष्ट होणार आहे. त्यांना सुख आणि दु:ख अशा दोन्ही बाबींना सामोरे जावे लागते आणि अर्जुनाला आता दु:खाचा सामना करावा लागतो आहे. दुसरा भाग आहे देही, जो शाश्वत आहे. श्रीकृष्ण यावर भर देतात आणि सांगतात की आपण स्वत:ला शरीर आणि मनाशी (असत) न जोडता देहीशी (सत) जोडले पाहिजे.बुद्धत्व (ज्ञानप्राप्ती) तेव्हा प्राप्त होते जेव्हा ही ओळखच गळून पडते आणि ते केवळ अनुभवानेच समजूण घेता येऊ शकते आणि ते शब्दात व्यक्त करणे शक्य नसते.

गीतेच्या ज्या भागात श्रीकृष्ण अर्जुनाला लढण्यासाठी उद्युक्त करतात तो भाग समजून घेण्यासाठी सर्वात कठीण आहे. काही जण म्हणतात कुरुक्षेत्रातील युद्ध कधीच घडले नाही आणि ते केवळ आपल्या रोजच्या जगण्यातील संघर्षाचे रुपक आहे. अर्जुनाने माघार घेतल्याने युद्ध संपले असते असे नाही. जागृती आणि जाणीव या शस्त्रांच्या साहाय्याने युद्ध लढले पाहिजे हे श्रीकृष्ण वारंवार सांगतो. अर्जुनाने युद्धातून माघार घेतली तर अहंकारामुळे (अहम-कर्ता) तो कायम नैराश्याचा गुलाम राहील. त्यामुळे, श्रीकृष्ण त्याला सत समजून घेण्यास आणि युद्ध लढण्यास सांगतात.

 


Comments

Popular posts from this blog

89. स्वत: ला मुक्त करा

88. पापाचे पैलू

68. शब्द आणि कृतीत समानता