21. कल्पकता नष्ट करता येत नाही

 


अंतरात्म्याला समजून घेण्याच्या प्रयत्नात दोन प्रकारच्या शहाण्या बुद्धिमंतांनी मानवजातीला मदत केली आहे. एक जण सकारात्मक पद्धतीने विचार करतो तर दुसरा नकारात्मक बाजूकडे लक्ष वेधतो आणि या दोघांचेही गंतव्यस्थान एकच असते. दोघांच्या प्रवासाच्या प्रारंभबिंदूमध्ये फरक आहे आणि आपल्या स्वभावानुसार मार्गाची निवड ठरते.

सकारात्मक दिशा देणारे 'ते' जे अविनाशी, शाश्वत, स्थिर आणि सर्वव्यापी आहे असे 'पूर्ण' म्हणून वर्णन करते, ज्यामध्ये काहीही जोडायचे नाही. सर्जनशीलताहे याचं रूपक आहे.

नकारात्मक दिशा देणारे 'ते' जे अविनाशी, शाश्वत, अचल आणि सर्वव्यापी आहे असे वर्णन 'शून्य' असे करतात ज्यातून काहीही बाहेर काढून घेता येत नाही. अवकाशहे याचं रूपक आहे.

दोन्ही बाबतीत, सर्जनशीलता आणि अवकाश हे निर्मिती/भौतिक प्रकटीकरण करू शकतात. आपण हे स्वत:हून समजून घेऊ शकतो की सर्जनशीलतेमुळे निर्मिती होते.

दुसरीकडे, विज्ञान या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे की हे विश्व 'काहीच नाही' ने बनले आहे आणि हे विश्व अस्तित्वात आणण्याची क्षमता अवकाशात आहे. सर्वात लहान अणूपासून बलाढ्य विश्वापर्यंत, अवकाश सर्वव्यापी आहे.

नेहमी ज्या श्लोकाचा उल्लेख होतो (2.23), त्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतो, आत्म्याला शस्त्राने विछिन्न करता येत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही आणि वारा त्याला वाळवू शकत नाही.

अवकाश किंवा सर्जनशीलतेला कुठल्या शस्त्राने नष्ट करणे शक्य आहे का? अर्थातच नाही. जास्तीत जास्त ते सर्जनशीलतेचे भौतिक रुप बदलू शकते. त्याचप्रमाणे, आगीमुळे सर्जनशीलता किंवा अवकाश नष्ट होऊ शकत नाही. तिची क्षमता/ताकद ही केवळ लाकडाला राखेत बदलणे इतकीच आहे आणि ही दोन्ही भौतिक रुपे आहेत. पाणीदेखील सर्जनशीलता किंवा अवकाश यांना विरघळून टाकू शकत नाही. त्याचप्रमाणे, वार्‍यामध्येही या दोन्ही बाबींना वाळवून, कोमेजून टाकण्याची शक्ती किंवा कौशल्य नाही.

सर्जनशीलतेमुळे निर्मिती अस्तित्वात येते, मात्र निर्मितीमध्ये सर्जनशीलतेवर परिणाम करण्याची शक्ती नाही. दिशा ही महत्वाची बाब आहे. आकाशात ढग येतात आणि जातात, मात्र ते आकाशावर परिणाम करू शकत नाहीत.


Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही