23. आत्मा अव्यक्त आहे

 


श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की, हा आत्मा अव्यक्त, अचिन्त्य आणि विकाररहित आहे, असे म्हटले जाते. म्हणून, हे अर्जुना! हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही (2.25). श्रीकृष्ण पुढे म्हणतात, हे अर्जुना! सर्वच जीव हे त्यांच्या जन्मापूर्वी अप्रकट अवस्थेत असतात आणि मृत्युनंतरही अप्रकट होणार असतात. त्यांचा जन्म आणि मृत्यू यादरम्यानच ते प्रकट अवस्थेत असतात. मग अशा स्थितीत शोक कशाला करायचा (2.28)?

हे पटवून देण्यासाठी विविध संस्कृतींमध्ये समुद्र आणि लाटा यांचे उदाहरण देण्यात आले आहे. समुद्र हे अप्रकटाचे तर लाटा हे प्रकटाचे स्वरुप आहे. लाटा या समुद्रातून काही काळासाठी निर्माण होतात आणि त्या विविध आकार आणि तीव्रतेच्या असतात. आपली इंद्रिये केवळ अप्रकट गोष्टी म्हणजे लाटाच अनुभवू शकतात. अंतिमत: या लाटा ज्या समुद्रातून आल्या तेथेच विलिन होतात.

त्याचप्रमाणे बीजामध्ये वृक्ष बनण्याची क्षमता असते. झाड बीजात सुप्त स्वरूपात असते. ते दिसते आणि झाडात वाढू लागते. अनेक बिया तयार केल्यानंतर ते शेवटी मरते.

इंद्रिये त्यांच्या मर्यादित क्षमतेने ज्यांचा अनुभव घेऊ शकतात त्या गोष्टी प्रकट म्हणून ओळखल्या जातात. आपल्या इंद्रियांची क्षमता वाढविण्यासाठी वैज्ञानिक उपकरणेही वापरली जातात. वस्तू बघण्याची आपल्या डोळ्यांची क्षमता वाढावी म्हणून मायक्रोस्कोप/दुर्बिण यांसारख्या उपकरणांचा वापर केला जातो. क्ष-किरण यंत्र प्रकाशाच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजमध्ये बघण्याची डोळ्यांची क्षमता वाढावी म्हणून वापरले जाते.

श्रीकृष्ण म्हणतात की अप्रकट हे अजन्मा आहे, म्हणजे वैज्ञानिक उपकरणे वापरूनही आपल्या इंद्रियांना त्यांचा अनुभव घेता येणार नाही. मन हे विविध इंद्रियांच्या संयोगातून बनले असल्याने ते अप्रकटाचा वेध घेऊ शकत नाही.

आपल्या सगळ्यांप्रमाणेच अर्जुन स्वत:ला केवळ एका शरीरापुरते मर्यादित ठेवतो कारण त्याला त्यापलीकडील जाणिव किंवा अनुभव नाही. श्रीकृष्ण अर्जुनाच्या या विचारांमध्येच पूर्ण बदल आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्याकरिताच त्याला तो अप्रकटाचे ज्ञान देतो. अर्जुनासारख्या प्रतिभावंतालाही हे समजावून सांगण्यासाठी भगवंताला स्वत:ला हे काम करावे लागले आणि त्यामुळे आपणही काही अपवाद नाही.

 


Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही