29. संतुलनच सर्वोच्च

 


श्लोक 2.38 गीतेचे संपूर्ण सार प्रतिबिंबित करतो. श्रीकृष्ण अर्जुनला सांगतात की, जर त्याने सुख-दु:ख, नफा-हानी, विजय-पराजय समान मानून युद्ध केले तर त्याच्याकडून कोणतेही पाप होणार नाही. इथे 'समानतेचा' संदर्भ युद्धासह आपल्या सर्व कृतींना लागू पडतो हे विशेष.

हा श्लोक सांगतो की आपली सगळी कर्मे ही प्रेरित असतात आणि ही प्रेरणा आपल्या कर्माला अशुद्ध किंवा पापयुक्त बनवते. परंतु आनंद, लाभ किंवा विजय मिळविण्यासाठी किंवा दुःख, नुकसान किंवा पराजय टाळण्यासाठी प्रेरीत नसलेली कोणतीही कृती आपल्याला क्वचितच माहित असेल किंवा घडत असेल.

सांख्य आणि कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून, कोणतेही कर्म तीन भागांमध्ये विभाजित करता येते, कर्ता (करणारा), चेष्टा (कृती) आणि कर्मफळ (कृतीचा परिणाम). श्रीकृष्णा ने कर्मफळाला सुख/दु:ख,  नफा/तोटा आणि जय/पराजय यांच्यामध्ये विभाजित केले आहे.

या श्लोकात श्रीकृष्ण समता साधण्यासाठी या तिघांना वेगळे करण्याचे संकेत देत आहेत. एक मार्ग आहे कर्तापण सोडून देण्याचा (कर्तेपणाची भावना) आणि केवळ साक्षी बनण्याचा (साक्षीदार). आयुष्य नावाच्या महानाट्यात आपण केवळ क्षुल्लक भूमिका साकारत असतो. दुसरा मार्ग आहे हे समजून घेण्याचा की कर्मफळावर आपला काहीही अधिकार नाही (कृतीचा परिणाम) कारण ते आपल्या प्रयत्नांखेरीज इतर अनेक गोष्टींचे मिश्रण असते. कर्तापण आणि कर्मफळ सोडून देण्याचे मार्ग हे एकमेकांशी जुळलेले आहेत आणि एका मार्गावरील प्रगतीमुळे दुसऱ्या मार्गावरील प्रगतीला सहाय्य होते.

कर्माचा विचार केल्यास हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्यापैकी कुणीही या ग्रहावर येण्यापूर्वी ते अस्तित्वात होते. त्यावर मालकी हक्क सांगता येत नाही किंवा नियंत्रणही राखता येत नाही.

या श्लोकाकडे भक्तियोगाच्या नजरेतूनही बघता येते जेथे भाव (उद्देश) हेच सगळे काही. श्रीकृष्ण तर कर्मापेक्षाही भावाला प्राधान्य देतात. ही अंतर्गत शरणागतता आपोआप समत्व आणते.

प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनानुसार आणि स्वभावानुसार आपापला मार्ग निवडू शकतो. पद्धत कॊणतीही असो, केवळ या श्लोकांवर ध्यान केंद्रित केल्यास व्यक्तीला अहंकारमुक्त अंतरात्मा प्राप्त करता येऊ शकतो.

एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या मनःस्थितीनुसार, तो स्वतःचा मार्ग निवडू शकतो. दृष्टीकोन कोणताही असो, या श्लोकाचे मनन केल्यानेच अहंकारमुक्त विवेक प्राप्त होतो.

 


Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही