30. पाणी, वाळू आणि दगडावर लिहिणे
श्रीकृष्ण
म्हणतात की सांख्ययोग (2.11-2.38) बद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर ते आता योग म्हणजे कर्मयोगाचे
स्पष्टीकरण देतील, ज्याचा अभ्यास माणसाला कर्माच्या बंधनातून मुक्त करेल (2.39).
सांख्य
योग सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तो एक नष्ट न करता येणारे चैतन्य आहे
(जाणीव) ज्याला मरण नाही. या श्लोकापासून पुढे श्रीकृष्ण कर्मयोगाचा माध्यमातून
हेच सांगू इच्छितात. त्यामुळे, या संदर्भात कर्मबंधन आणि योग समजून घेण्याची गरज आहे.
योगाचा
शब्दशः अर्थ एकत्र येणे असा होतो आणि गीते मध्ये विविध
संदर्भांमध्ये त्याचा वापर केला जातो. श्रीकृष्ण समतेला योग म्हणतात (2.48). हे
धनंजय! तू आसक्ती सोडली पाहिजे आणि परिपूर्ण
आणि अपूर्ण यांच्यात समानता राखली पाहिजे. समतेला योग म्हणतात. तसेच श्लोक 2.38
मध्ये, कृष्ण अर्जुनाला
सुख-दु:ख, विजय-पराजय आणि
नफा-तोटा यांची बरोबरी करून युद्धाची तयारी करण्यास प्रोत्साहित करतो.
आपल्या
कर्मांमुळे उमटलेले चांगले-वाईट प्रभाव किंवा ओरखडे आणि त्यातून उत्पन्न होणार्या
अंतर्बाह्य प्रतिक्रिया यांचा कर्मबंधनामध्ये समावेश होतो. त्यांना निष्पक्ष
पॅटर्न्स म्हटले पाहिजे. हे प्रभाव आपल्या नेणिवेतून आपल्या वर्तनाला दिशा देत
असतात आणि म्हणून श्रीकृष्ण आपल्याला कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी योगमार्गाचा
अवलंब करावयास सांगतात.
जे
प्रभाव सुख आणि लाभ देतात त्या प्रभावांना चिकटून राहण्याचा आपला स्वभाव असतो.
त्याच वेळी आपण दु:ख आणि तोटा यांना दूर सारत असतो. हे दोन्ही प्रभाव जितके खोलवर
असतील तितके त्यांना चिकटून राहणे किंवा त्यांच्यापासून दूर जाणे यांची तीव्रता
अधिक असते.
या
प्रभावांची ताकद ही दगड, वाळू आणि पाणी यांच्यावर लिखाण करण्यासारखी असते. जेव्हा
दगडावर लिखाण केले जाते तेव्हा ते खोलवर उमटते आणि दीर्घकाळ टिकून राहणारे असते.
वाळूवरचे लिखाण कमी काळ टिकते आणि पाण्यावर
लिहिलेले तर क्षणात नाहीसे होते.
कर्मयोग
आपल्याला कर्मबंधनातून मुक्त करतो आणि आपल्याला इतके ‘सरल’ करतो की कशाचाच
आपल्यावर परिणाम होऊ शकत नाही, कशाचाच ताण येऊ शकत नाही. पाण्यावरील प्रभाव नमूद
करताना श्रीकृष्ण हेच सांगत असतात.

Comments
Post a Comment