33. अंतरात्मा वेदांच्या पलीकडे आहे


 

एकदा, काही मित्र प्रवास करत होते आणि त्यांना एक विस्तीर्ण नदी पार करावी लागली. त्यांनी एक बोट बनवली आणि नदी पार केली. मग उपयोग होईल असा विचार करून उरलेल्या प्रवासात जड बोट सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचा प्रवास संथ आणि वेदनादायी झाला. इथे नदी म्हणजे वेदनेची ध्रुवता आहे आणि बोट हे वेदना दूर करण्याचे साधन आहे.

त्याचप्रमाणे, आपल्या रोजच्या आयुष्य़ातही अशा दु:खाच्या द्वंद्वावर मात करण्यासाठी अनेक साधले आणि प्रथा आपल्याला उपलब्ध आहेत. तात्कालिक दु:खाच्या द्वंद्वांपासून मुक्ती मिळविण्यासाठी वेदांमध्ये अनेक प्रथा आणि कर्मकांड सांगितले आहे आणि त्यापैकी अनेक आजही आचरणात आणले जातात. आरोग्य, व्यवसाय, काम आणि कुटुंबाच्या संदर्भात येणार्‍या अडचणींसाठी अशा कर्मकांडांचा आश्रय घेणे हे तर्कशुद्धही वाटते.

श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, वेदांचा बाह्य अर्थ सांगून या जन्मात आणि पुढील जगामध्ये (स्वर्गात) सुखाचे वचन देणाऱ्या मूर्खांच्या शब्दात अडकू नये (2.42-2.46). आत्मवान होण्यासाठी तो अर्जुनाला द्वंद्वातीत आणि गुणातीत होण्यास प्रोत्साहित करतो (2.45). जेव्हा एखादा मोठा तलाव सापडतो तेव्हा त्याला लहान तलावाची गरज नसते आणि त्याचप्रमाणे आत्मवानसाठी वेद हे त्या लहान तलावासारखे असतात (2.46).

आपल्या प्रवासात नावेचे ओझे न बाळगण्यात जसे शहाणपण आहे तसेच श्रीकृष्ण हे सूचित करतात की सुख आणि सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नातील निरर्थकता लक्षात आल्यावर वेदांच्याहीपल्याड जायला हवे.

गीतेच्या अगदी सुरुवातीला, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की इंद्रिये सुख-दुःखासारखे ध्रुव निर्माण करतात आणि त्याला सहन करण्यास सांगतात कारण ते अशाश्वत आहेत (2.14). त्यांच्या पल्याड जाणे आणि या अनित्याचा प्रेक्षक म्हणून पाहण्यावर त्यांचा भर असतो. श्रीकृष्ण कृत्रिम सुखाऐवजी अस्सल आनंदाच्या बाजूने आहेत.

Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही