34. कर्मावर लक्ष केंद्रित करा, कर्मफलावर नाही


  

गीतेच्या सुप्रसिद्ध श्लोक 2.47 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, त्याच्या परिणामांवर म्हणजेच कर्मफलांवर आपला अधिकार नाही. ते पुढे म्हणतात की कर्माचे फळ हे आपल्या कोणत्याही कृतीची प्रेरणा असू नये आणि कृती न करण्याकडे आपला कल नसावा. हा गीतेचा सर्वात उद्धृत श्लोक आहे कारण तो जीवनाच्या विविध आयामांमध्ये पाहिला जाऊ शकतो.

श्रीकृष्ण सूचित करतात की श्रद्धा चमत्कार करू शकतो (7.21-7.22). हा श्लोक समजून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्रीकृष्णावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या तर्कशास्त्रात खोलवर न जाता किंवा त्याच्या विविध पैलूंचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न न करता ते आपल्या जीवनात लागू करणे. आपण श्रीकृष्णावरील आपली श्रद्धा अधिक दृढ केली पाहिजे आणि त्याचे आचरण सुरू केले पाहिजे. या श्लोकाचा शाब्दिक अर्थ आचरणात आणला तरच आपण कर्मयोगाच्या शिखरावर पोहोचू शकतो.

त्यापुढची पायरी हे समजून घेण्याची आहे की कर्मफलावर आपण लक्ष केंद्रित केल्यास आपले कर्मावरील लक्ष ढळू शकते आणि त्याचा परिणाम म्हणून कर्मफलदेखील हिरावून घेतले जाऊ शकते. चांगला अभ्यास न केल्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षेच्या निकालात अपेक्षित असलेले कर्मफल हिरावून घेऊ शकते. परिस्थिती कोणतीही असो आपण आपले सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

तिसरा भाग असा की, कर्म हे नेहमी वर्तमानकाळ घडते तर कर्मफल हे भविष्यात मिळते आणि त्यातही अनेक शक्यतांचा समावेश असू शकतो. आपण केवळ वर्तमानाला नियंत्रणात ठेवू शकत असल्याने आणि भविष्यावर आपले काहीही नियंत्रण नसल्याने श्रीकृष्ण आपल्याला कायम वर्तमानात जगण्यास सांगतात.

दृष्टीकोन किंवा समज कोणताही असो, या श्लोकात आनंद आणि दुःखाच्या कधीही न संपणाऱ्या लाटा ओलांडण्यास मदत करून आपल्यात समता आणण्याची क्षमता आहे.

Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही