45. जन्म-मृत्यूचे भ्रामक बंध
श्रीकृष्ण
म्हणतात, “समबुद्धी असलेला, कर्मांच्या
फळाचा त्याग करून जन्माच्या बंधनातून मुक्त होऊन, कोणत्याही दुर्गुणांशिवाय परम
स्थितीला प्राप्त होतो” (2.51).
बर्याच
काळापासून, मानवजातीचा असा विश्वास
होता की सूर्य स्थिर पृथ्वीभोवती फिरतो आणि नंतर शोधला की ही पृथ्वीच सूर्याभोवती
फिरते. सरतेशेवटी, आमची समज अस्तित्त्विक सत्याशी जुळली, याचा अर्थ असा की समस्या आमच्या
संवेदनांच्या मर्यादांमुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे उद्भवलेल्या सत्याच्या
चुकीच्या व्याख्यामुळे होती. जन्म-मृत्यूबद्दलच्या आपल्या भ्रमाचेही असेच आहे.
श्रीकृष्ण
गीतेचा प्रारंभ ‘देही’ संकल्पनेचे वर्णन करून करतात (जो शरीरात असतो-आत्मा). हा
आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा
उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर
मारले गेले तरी हा मारला जात नाही. (2.20). ते पुढे म्हणतात की,ज्याप्रमाणे माणूस जुनी
वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी
शरीरे टाकून दुसर्या नव्या शरीरात जातो (2.22). जेव्हा तो म्हणतो की संतुलित
बुद्धिमत्तेने व्यक्ती जन्माच्या बंधनातूनमुक्त होते तेव्हा त्याला हे सांगायचे
आहे की ती व्यक्ती देही/आत्म्याच्या अस्तित्वात असलेल्या सत्याशी स्वत:ला जोडून
घेत असते. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो या भासातून बाहेर पडणे आणि पृथ्वी सूर्याभोवती
फिरते या सत्याशी स्वत:ला जोडून घेण्यासारखे आहे ते.
आपला
कल बहुतांश वेळा बहुसंख्यांकडे असतो, मात्र हे बहुसंख्य (ज्यांचा जन्म-मृत्यूवर
विश्वास असतो) आपल्याला देही/आत्म्याच्या वास्तवाबद्दल मार्गदर्शन करू शकत नाही
आणि ते आपण केवळ आपल्या संतुलित बुद्धिमत्तेनेच जाणून घेऊ शकतो.
श्रीकृष्ण ने ध्रुवीयतेच्या पलीकडे असलेल्या अवस्थेबद्दलही सांगितले आहे. सहसा, त्याचे वर्णन स्वर्ग असे केले जाते आणि कधीकधी परमपद असे केले जाते जे बाहेर कुठेतरी आहे. हा श्लोक सूचित करतो की हा मार्ग आपल्या आत आहे. कर्मांचा त्याग न करता कर्मफलाचा त्याग करण्याचा हा मार्ग आहे (2.47).

Comments
Post a Comment