46. काय आमचे, काय नाही
श्रीकृष्ण
म्हणतात,
"जेव्हा
तुमची बुद्धी भ्रमाच्या दलदलीतून पूर्णपणे ओलांडली जाईल, त्या वेळी तुम्ही या जगाच्या आणि
परलोकातील सर्व सुखांपासून त्याग (निर्वेदम) प्राप्त कराल जे तुम्ही ऐकले आहे आणि
ऐकणार आहात" (2.52). याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण आसक्तीवर मात करतो
तेव्हा आपल्या इंद्रियांद्वारे निर्माण होणाऱ्या संवेदना आपल्या इच्छेनुसार
आपल्यावर प्रभाव टाकण्याची शक्ती गमावून बसतात.
अहंकाराप्रमाणेच
मोहाचेही योग्य शब्दांचे वर्णन करणे शक्य होत नाही. मूलत:, आपले काय आणि परके काय
याच्यात फरक न करता येण्याची कमतरता आहे. वर्तमान आणि भविष्यातील भौतिक गोष्टी आणि
भावनांबद्दलची ती मालकी हक्काची भावना आहे. खरे पाहता आपण काही त्यांचे मालक नाही.
जे आपले नाही त्यावरही आपण हक्क गाजविण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्यक्षात आपले काय
आहे- देही/आत्मा/प्राण- याची आपल्याला पुसटशीही जाणिव नसते. श्रीकृष्ण या
प्रक्रियेला ‘कलीलम’ किंवा
आध्यात्मिक अंधार म्हणतात.
श्रीकृष्ण
पुढे म्हणतात की हा अंधार दूर केल्यावर आपल्याला ‘निर्वेदम’ प्राप्त होतो. जरी निर्वेदाचे वर्णन
उदासीनता असे केले गेले असले तरी, ती अज्ञानातून जन्मलेली निष्क्रिय किंवा नकारात्मक उदासीनता नाही.
उदासीनतेतून, जिवंत राहून आणि वर्तमानात जगण्यापासून निर्माण होणारी जाणीव आहे. ही
आसक्ती किंवा विरक्ति नाही, परंतु दोन्हीच्या पलीकडे आहे. हे विभाजनाशिवाय सक्रिय स्वीकृती आहे.
इतरांकडे
बघत जगण्याच्या पद्धतीत आपण आपल्या भौतिक गोष्टींना, क्षमतांना, यशाला, वर्तनाला,
दिसण्याला इतरांकडून स्वीकारार्हता मिळेल, कौतुक आणि प्रशंसा होईल अशी अपेक्षा
करत असतो. या बाह्य संवेदना अनुभवास
याव्या म्हणून आपण संपूर्ण आयुष्यभर प्रचंद कष्ट घेत राहतो. अर्थात जोपर्यंत आपण
आपल्या मोहावर मात करीत नाही तोपर्यंतच हे सुरू असते.
एकदा आपण संतुलित बुद्धिमत्तेचा उपयोग करून मोहाने निर्माण केलेला अंध:कार दूर केला की वर्तमान आणि भविष्याचे या इंद्रियजन्य दृष्टिकोनांचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही.

Comments
Post a Comment