47. भ्रम टाळा

 

आपल्या जीवनाच्या सामान्य वाटचालीत जेव्हा आपण एकाच विषयावर परस्परविरोधी मते ऐकतो तेव्हा आपण गोंधळून जातो - मग ते बातम्या, तत्त्वज्ञान, अनुभव आणि इतरांचे विश्वास असो. श्रीकृष्ण म्हणतात की भिन्न मत ऐकूनही जेव्हा बुद्धी शांत आणि समाधीमध्ये स्थिर राहील तेव्हाच आपल्याला योगाची प्राप्ती होईल (2.53).

ही बाब समजून सांगण्यासाठी झाड हे एक उत्तम रुपक आहे. झाडाचा वरचा भाग आपल्याला दिसत असतो तर मुळांसह खालचा भाग हा जमिनीखाली असल्याने आपल्याला दिसत नाही. वार्‍याचा जोर जितका असेल तितका वरच्या भागावर परिणाम होत असतो मात्र मुळांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. वरचा भाग बाह्य शक्तींमुळे हलत राहतो तर आतला भाग हा समाधीमध्ये निश्चल असतो आणि स्थैर्य व पोषण देण्याचे आपले काम करत राहतो. झाडांसाठी हीच योगस्थिती आहे जेथे बाहेरील भाग हलतो आहे आणि आतील भाग निश्चल आहे.

आपण अज्ञानी असताना आपली बुद्धिमत्ताही दोलायमान असते जी बाहेरील शक्तींच्या दबावामुळे आपोआप कंप पावत राहते. बाह्य जगाला ही दोलायमान स्थिती रागामुळे आणि पटकन येणार्‍या प्रतिक्रियांमुळे सहज लक्षात येते. यातून आपले आणि आपले कुटुंबीय आणि सहकारी यांचेही जगणे त्रासदायक होते. काळाच्या ओघात आलेल्या अनुभवांमुळे काही जण वरची पातळी गाठतात आणि ही वर्तमानातील मुखवटे घालून आयुष्यातील ही कंपने झाकायलाही शिकतात. अशा स्थितीत, ही कंपने आत असतात, मात्र बाह्य स्वरूपात व्यक्ती शूर आण आनंदी राहण्याचा देखावा करीत असते. ही स्थिती काही फार काळ टिकून राहू शकत नाही.

या श्लोकात, श्रीकृष्ण समाधी स्थितीतील अत्युच्च निश्चल अवस्थेबद्दल बोलतात जी दुसरी-तिसरी काही नसून ही कंपने अस्तित्वात नसणे असते. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर ही बाह्य कंपने ही अनित्य असतात आणि आपण आपल्या अंतरात्म्याशी जोडून घेतले पाहिजे जो समाधीमध्ये निश्चल आहे, याची जाणिव हा श्लोक करून देतो (2.14).


Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही