49. स्थितप्रज्ञा ही आंतरिक घटना आहे
अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतात की स्थितप्रज्ञ हा स्वत:बद्दल समाधानी असतो (2.55). यातील गंमतीचा भाग असा की स्थितप्रज्ञ चालतो-बोलतो कसा या अर्जुनाच्या प्रश्नाला मात्र श्रीकृष्ण काहीच उत्तर देत नाही.
‘स्वत:बद्दल
समाधानी’ ही पूर्णपणे अंतर्गत प्रक्रिया आहे आणि बाह्य वर्तनावरून तिचे अनुमान
किंवा आकलन अजिबात शक्य नाही. एखाद्या परिस्थिती अज्ञानी मनुष्य आणि स्थितप्रज्ञ
सारख्याच भाषेत बोलू शकतो, एकसारखाच चालू–वागू शकतो. या परिस्थितीमुळे आपल्या मनात
स्थितप्रज्ञतेबद्दल अधिकच गुंतागुंत निर्माण होते.
कृष्णाचे
आयुशःय हे स्थितप्रज्ञतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. तो जन्मत:च आपल्या पालकांपासून
दूर झाला. ‘त्याला ‘माखनचोर’ म्हणून ओळखले गेले. त्याचे प्रेम, नृत्य आणि बासरी या
सगळ्यांच्या कथा झाल्या, मात्र जेव्हा त्याने वृंदावन सोडले त्यानंतर तो या
प्रेमासाठी कधीही परत आला नाही. गरज होती तेव्हा तो लढला आणि जीवही घेतले, पण
विविध वेळी त्याने युद्ध टाळले आणि त्यातून त्याला रणछोडदास असेही नाव मिळाले.
त्याने अनेक चमत्कार दाखवले आणि मित्र म्हणूनही तो सर्वोत्तम होता. लग्न करायची
वेळ आली तेव्हा त्याने ते केले, कुटुंब सांभाळले, चोरीचा खोटा आळ नष्ट करता यावा
म्हणून समंतक मणी त्याने शोधून आणला आणि गीतेचे ज्ञान सांगायची वेळ आली तेव्हा ते
ही केले. एका सामान्य माणसासारखा त्याचा मृत्यू झाला.
सर्व
प्रथम, त्यांच्या
जीवनाची रचना वर्तमानात जगण्याची आहे. दुसरे म्हणजे, कठीण परिस्थितीतही ते आनंदाचे आणि
उत्सवाचे जीवन आहे, कारण त्याने अडचणींना अनित्य मानले. तिसरे, श्लोक 2.47 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, त्यांच्यासाठी
स्वतःवर समाधानी असणे म्हणजे निष्क्रियता नाही, तर कर्तात्वाची भावना आणि कृतीच्या
परिणामाची अपेक्षा सोडून कृती करणे असा होतो.
मूलत:,
भूतकाळाचे ओझे मनावर न घेता आणि भविष्याकडून कोणतीही अपेक्षा न करता वर्तमान
क्षणात जगायला हवे. या वर्तमान क्षणात शक्ती आहे आणि नियोजनापासून ते
अंमलबजावणीपर्यंत सगळे काही याच वर्तमान क्षणात घडत असते.

Comments
Post a Comment