56. अध्यात्मातील कारण आणि प्रभाव

 

श्रीकृष्ण म्हणतात, "जेव्हा मन आनंदी असते, तेव्हा माणसाचे सर्व दुःख नष्ट होतात आणि त्या आनंदी कर्मयोगीचे मन लवकरच इतर सर्व गोष्टींपासून दूर होऊन केवळ भगवंतात स्थिर होते" (2.65). आमचा विश्वास आहे की, एकदा आपल्या इच्छा पूर्ण झाल्या की आपण समाधानी होतो आणि आनंद प्राप्त करतो. पण श्रीकृष्ण आपल्याला आधी समाधानी व्हायला सांगतात आणि बाकी आपोआप होते.

उदाहरणार्थ, आपल्याला ताप, वेदना असतील तर आपण आजारी आहोत असा निष्कर्ष आपण काढतो. या लक्षणांचे केवळ तात्पुरते दमन उपयोगाचे नाही तर त्यांच्यावर मुळापासून उपचार करणे गरजेचे आहे. दुसर्‍या बाजूला पोषक आहार, उत्तम झोप, शारीरिक तंदुरुस्ती या गोष्टी पाळल्या तर आपल्याला चांगले आरोग्य लाभू शकते.

त्याचप्रमाणे, दु:खाचाच भाग असलेले भय, क्रोध आणि द्वेष ही समाधानी नसल्याची लक्षणे आहेत आणि त्यांच्या दमनाने आपण खरेखुरे समाधानी होऊ शकत नाही. आपले वर्तन नीट व्हावे म्हणून या लक्षणांच्या दमनाकरिता अनेक तातडीचे उपाय सांगितले जातात किंवा प्रत्यक्ष आचरणातही आणले जातात. मात्र, हे वरवरचे दमन नंतर पुन्हा आणखी जोमाने उफाळून येते. उदाहरणार्थ, आपल्या वरिष्ठांच्या विरोधातील राग हा बहुधा आपले कनिष्ठ किंवा कुटुंबातील सदस्य यांच्यावरच निघतो.

समाधानाचा खरा मार्ग म्हणजे या जगाचे द्वंद्वात्मक रुप समजून घेणे हा आहे. कर्मफलाची अपेक्षा केल्याविना कर्म करत राहण्याचे महत्व समजून घ्यायला हवे आणि कृती, विचार आणि भावना यांचे आपण कर्ते नाहीत तर केवळ साक्षी आहोत हेदेखील समजून घ्यायला हवे.

आपल्यातील अप्रकट असा भाग देही/आत्मा हा कायमच समाधानी असतो आणि प्रकटाचे चुकीचे स्वरुप ध्यानात घेतल्याने काही दु:खे ही तात्पुरत्या क्षुल्लक स्वरुपात निर्माण होत असतात. पुन्हा एकदा येथे साप आणि दोरी यांची गोष्ट ध्यानात घ्यायला हवी.

श्रीकृष्ण इतरत्र स्पष्ट करतात की आत्म्याशी ओळख झाल्यामुळे दु:ख दूर होते आणि या अवस्थेला ते आत्मारमन किंवा आत्मवान म्हणतात (2.45). हे दडपशाही किंवा दु:ख व्यक्त करणे नाही तर ते पाहण्यास आणि त्या पार करण्यास सक्षम असण्याबद्दल आहे.

Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही