57. मध्यभागी केंद्रित
श्रीकृष्ण
म्हणतात की अयुक्त (अस्थिर) माणसाला बुद्धी आणि भावना दोन्ही नसतात आणि परिणामी
त्याला शांती मिळत नाही आणि अशांत माणसाला सुख मिळत नाही (2.66). श्रीकृष्ण ने समत्वावर जोर दिला (2.38 आणि 2.48) आणि हा श्लोक वेगळ्या
दृष्टिकोनातून त्यावर प्रकाश टाकतो.
जोपर्यंत
माणूस मध्याशी केंद्रीत होत नाही तोपर्यंत तो मित्र, शत्रू, काम, जोडीदार, संतती, धन, सुख, सत्ता, संपत्ती अशा काही केंद्रांमध्ये स्वतःला स्थिर करून घेतो आणि हीच
अयुक्ताची ओळख आहे.
ज्याचे
लक्ष पैशावर केंद्रित असते त्याच्या सगळ्या योजना आणि कृती या संपत्ती
वाढविण्याभोवती फिरत असतात आणि नाती, आरोग्य इत्यादींकडे त्याचे दुर्लक्ष होते. केवळ भौतिक सुखाभिलाषी जो
असतो तो ते मिळविण्यासाठी फसवणे किंवा
इतर काहीही करण्यास तयार असतो. जोडीदाराभिमुख व्यक्ती त्यांच्या जोडीदारासोबतच्या
लोकांच्या वर्तनावर आधारित नातेसंबंधांचे मूल्यांकन करते. ज्याच्या मनात सदैव
शत्रूचा विचार असतो तो कायम शत्रूचे नुकसान कसे करायचे याचाच विचार करीत असतो आणि
या प्रयत्नात त्याचे स्वत:चे नुकसान होत असल्याचेही त्याला भान नसते.
आपण
जेव्हा इतरांशी बांधले गेलो असतो तेव्हा आपली शांतता आणि समाधान हे त्यांच्या हाती
असते, आपण परावलंबी
होतो. म्हणून श्रीकृष्ण समत्वावर भर देतो जेथे आपण मध्यभागी उभे असतो, जे अंतिम
स्वातंत्र्य (मोक्ष) आहे.
श्रीकृष्ण
ने भाव हा शब्द वापरला आहे, जो आपण आपल्या भावनांना समानार्थी म्हणून वापरतो. ‘माझ्या’शी संलग्न
असलेली व्यक्ती किंवा वस्तू अधिक खोल भावना निर्माण करते अन्यथा त्यांचा विचारही कधी
आपल्या मनात येत नाही. यावरून हे स्पष्ट होते आपल्या सगळ्या भावना या सापेक्ष आहेत
मात्र श्रीकृष्ण त्या ‘भावा’वर भर देतो जो
समत्वामधून निर्माण होतो. ‘मी’ किंवा 'माझे' असो किंवा नसो
तो कायम राहतो.
भवतालचे जग दु:खमय, त्रासदायक किंवा गोंधळयुक्त असू शकते पण मध्यभागी स्थिर असल्याने ज्याने अंतर्गत सुसंगती साधली आहे त्याच्यावर या कशाचाच परिणाम होत नाही आणि श्रीकृष्ण यालाचा ‘शांती’ प्राप्त करणे म्हणतो ज्यातून अंतिमत: आपल्याला आनंदप्राप्ती होते.

Comments
Post a Comment