58. आयुष्याचे चार टप्पे
श्रीकृष्ण म्हणतात की, “ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा
वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयांत वावरणाऱ्या इंद्रियांपैकी
मन ज्या इंद्रियाबरोबर राहते, ते एकच इंद्रिय
या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते”
(2.67). वारा हे आपल्या इच्छांचे एक रूपक आहे जे आपल्या
मनावर आणि इंद्रियांवर प्रभाव टाकते आणि बुद्धीला (बोट) अस्थिर करते.
इच्छांच्या
संदर्भात, आयुष्य हे चार टप्प्यांमध्ये विभागले गेले आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ,
वानप्रस्थ आणि संन्यास. ही विभागणी केवळ वयाच्या आधारे केली नसून जगण्याच्या
तीव्रतेनुसार केली आहे.
पहिल्या
टप्प्यात आपली वाढ होत असते तसेच सैद्धांतिक ज्ञान, शारीरिक बल आणि काही मूलभूत
कौशल्ये आपण मिळवीत असतो. दुसर्या टप्प्यात कुटुंब, काम, कौशल्यवृद्धी, वस्तू आणि
आठवणींचा संग्रह, आयुष्याच्या विविध रुपांचे दर्शन, इच्छांमुळे मिळणारे अनुभव आणि
त्यातून उत्पन्न होणारे यशापयश यांचा समावेश होतो. या प्रक्रियेतून, ज्ञान,
कौशल्ये आणि आयुष्यातून अनुभवांचा मिश्र संग्रह आपल्याकडे जमा होतो आणि त्यातून
आपल्यात जाणिवेचा जन्म होतो.
तिसर्या
टप्प्याला आपोआप प्रारंभ होत नाही. महाभारतात नमूद केलेल्या कथेनुसार राजा ययातीने
या स्थित्यंतरासाठी हजार वर्षे लावली कारण त्याला भौतिक सुखांचा त्याग करायचा
नव्हता. गंमत म्हणजे, आपल्या मुलांचे बळी देऊन त्याला ही हजार वर्षे मिळाली होती. या
परिस्थितीत, हा श्लोक (2.67)
आपल्याला प्रतिबिंबित करण्यास आणि तिसऱ्या टप्प्यावर जाण्यास मदत करतो.
तिसर्या
टप्प्यात झालेल्या जाणिवेने आपल्या हे लक्षात येते की भूतकाळातील इच्छा या
मूर्खपणाच्या होत्या किंवा आता त्या संदर्भहीन आहेत आणि आपण त्या इच्छांचा हळुहळू
त्याग करायला लागतो. आपली गृहितके कशी चुकीची होती, पूर्ण आणि अपूर्ण अशा दोन्ही
इच्छांनी कसे घातक परिणाम केले हे ही आपल्या लक्षात यायला लागते. या जाणिवेमुळे,
आपण संन्यास या अखेरच्या टप्प्यासाठी तयार होतो, ज्यामध्ये अहंकाराचा/कर्तेपणाचा
त्याग करणे आणि ‘साक्षी’ होणे समाविष्ट आहे.
अंतिम टप्प्यात, पहिल्या टप्प्यातील इंद्रियांद्वारे ‘जाणून घेणे’ ते इंद्रियांपासून स्वतंत्र ‘असणे’ हे संक्रमण आहे. श्रीकृष्ण म्हणतात, "जेंव्हा सर्व इंद्रिये वस्तूंपासून रोखली जातात तेंव्हा बुद्धीची स्थापना होते" (2.68).

Comments
Post a Comment