62. 'मी' चा त्याग

 

श्रीकृष्ण उत्तर देतात, मी आधी म्हटल्याप्रमाणे, या जगात मोक्षाचे दोन मार्ग आहेत - ज्ञानी लोकांसाठी ज्ञानाद्वारे आणि योगींसाठी कर्ममार्गाने (3.3). हा श्लोक सूचित करतो की जागृतीचा मार्ग बुद्धीचा वापर करणाऱ्यांसाठी आहे आणि कृतीचा मार्ग मनाचा वापर करणाऱ्यांसाठी आहे.

श्रीकृष्ण पुढे स्पष्ट करतात की, केवळ कृती सुरू केल्याशिवाय मनुष्य निष्कर्म प्राप्त करू शकत नाही आणि केवळ त्याग करून सिद्धी प्राप्त करू शकत नाही (3.4).

बलिदानाचा गौरव जवळजवळ सर्वच संस्कृतींमध्ये केला जातो कारण त्याग करणारा काहीतरी करू शकतो जे सामान्य व्यक्ती करू शकत नाही. म्हणूनच राज्याच्या सुखसोयींचा त्याग करण्याची आणि युद्धाच्या वेदना टाळण्याची अर्जुनाची दृष्टी आपल्याला आकर्षित करते.

श्रीकृष्ण पण आपल्याला त्यागच करायला सांगतो मात्र तो प्रत्येक कृतीतून ‘मी’ वगळण्यावर भर देतो. कृष्णासाठी युद्ध हा फारसा महत्वाचा मुद्दा नाही तर अर्जुनामधील ‘मी’ हा महत्वाचा मुद्दा आहे. कृष्णासाठी, निर्मम आणि निरहंकार हा शाश्वत स्थितीचा मार्ग आहे (2.71).

आपल्या दैनंदिन आयुष्यात, पैसा, अन्न, वस्तू, सत्ता किंवा समाजात ज्याला मूल्य आहे अशा कोणत्याही गोष्टीचा त्याग असू शकतो. ‘मी पैसे कमावले आणि आता मी पैसे दान करतो आहे’ असे म्हणण्यासारखे ते आहे. जोपर्यंत ‘मी’ शिल्लक आहे तोपर्यंत पैसे कमावणे आणि दान करणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

साधारणत: आपण भौतिक वस्तूंच्या त्यागाचे कौतुक करतो त्यामुळे ही संकल्पना समजून घेणे जरा कठीण  आहे. निश्चितपणे ही प्रवासाची दुसरी पातळी आहे आणि प्रसिद्धी किंवा तत्सम काही तरी मिळविण्यासाठी हा त्याग केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, श्रीकृष्ण आपल्याला तेथे थांबू देत नाही आणि ‘मी’ चा त्याग करण्याचा अंतिम टप्पा गाठण्याबद्दम आग्रह करतो.

‘मी’ चा त्याग केला की सगळाच आनंद निर्माण होतो, अन्यथा आयुष्य नावाच्या या नाटकाची शोकांतिका बनू शकते.

Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही