68. शब्द आणि कृतीत समानता
जग
समजून घेण्यासाठी, नव्या गोष्टी, शिष्टाचार आणि वागणे शिकण्यासाठी, मुलांना आपल्या
पालकांचा आधार वाटत असतो. त्यामुळे, मुलांचे संगोपन करण्याची सर्वोत्तम पद्धत
म्हणजे पालकांनी ‘बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणे वागणे. हे अवलंबित्व पुढील
काळातही कायम राहते. कधी ते मित्रांवर असते, शिक्षकांवर असते तर कधी
मार्गदर्शकांवर. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्यावर अवलंबून असणारे लोक
नेहमीच असतात आणि त्यांना आपल्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असते. आपण जे काही करू
त्याचा त्यांच्यावर प्रभाव पडत असतो. या संदर्भात श्रीकृष्ण म्हणतात की, “श्रेष्ठ पुरुष
जे जे आचरण करतो, इतर लोकही त्याचे अनुकरण करत असतात. तो जे काही प्रमाण म्हणून
सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्यसमुदाय वागू लागतो. त्याच्या कृती या जगातील
इतरांसाठी आदर्शानुरुपच असतात” (3.21).
श्रीकृष्ण
पुढे विश्लेषण करतात, “त्रिलोकामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही जी मी केलेली नाही
किंवा अजून मिळवायचे राहिले असेल असेही काही उरलेले नाही, आणि तरीही मी कर्म करत
राहतो (3.22). जर एखाद्या
वेळेस मी माझे काम करणे थांबवले तर लोकदेखील माझे अनुकरण करणे सुरू करतील. कारण जर
कामी सावध राहून कर्मे केली नाहीत, तर मोठे नुकसान होईल. कारण मनुष्य सर्व प्रकारे
माझ्याच कार्गाचे अनुसरण करतात (3.23).
म्हणून जर मी कर्म केले नाही, तर ही सर्व माणसे नष्ट–भ्रष्ट होतील आणि मी संकरतेचे
कारण होईल. सगळ्या लोकांच्या नाशाला मी कारणीभूत ठरेल” (3.24).
स्पष्टपणे, श्रीकृष्ण हे
भगवंताच्या रूपात आहेत जे नंतर त्यांचे वैश्विक रूप दाखवतात. तो सर्जनशीलतेच्या
स्वरूपात देखील आहे ज्यामध्ये निर्मिती, देखभाल आणि विनाश यांचा समावेश आहे. या श्लोकांमध्ये श्रीकृष्णाने
सृजनशीलतेने आपले कर्तव्य करणे थांबवल्यास होणाऱ्या परिणामांबद्दल सांगितले आहे.
जेव्हा
शेतकरी गहू पेरतो तेव्हा सर्जनशीलता अंकुरांसाठी जबाबदार असते. सर्जनशीलता थांबली
तर बीज निरुपयोगी होते. अंकुर फुटल्यानंतर पीक वाढले नाही तर तेही गोंधळाचे कारण
आहे. ते वाढल्यानंतर, जर ते बियाणे तयार करत नसेल तर ते पिढ्या नष्ट करेल.
आपले
जीवन या विश्वात निर्माण झालेल्या दृश्य आणि अदृश्य स्वयंचलिततावर अधिक अवलंबून
आहे आणि हे पूर्णपणे सर्जनशीलतेने सतत केलेल्या अथक परिश्रमामुळे शक्य झाले आहे.

Comments
Post a Comment