71. गुणांची परस्पर प्रक्रिया

 

श्रीकृष्ण म्हणतात की,वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. तरीही ज्याचे अंत:करण अहंकाराने मोहित झाले आहे, असा अज्ञानी पुरुष ‘मी कर्ता आहे’ असे मानतो (3.27). पण, हे महाबाहो! गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणांत वावरत असतात, हे लक्षात घेऊन त्यांमध्ये आसक्त होत नाही(3.28).

गीतेची मूलभूत शिकवण अशी आहे की कोणत्याही कार्याचा कर्ता नसून ते गुणांमधील परस्पर प्रक्रियेचे परिणाम आहे. आपल्यापैकी प्रत्येकात सत्व, तम आणि रज असे तिन्ही गुण विविध प्रमाणात अस्तित्वात असतात. सत्व गुण हा ज्ञानाशी जोडला आहे, रजोगुण हा कृतीशी जोडला आहे आणि तमोगुण हा अज्ञान आणि आळशीपणाशी संबंधित आहे.

कोणताच गुण हा दुसर्‍या गुणापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही, ते केवळ गुण आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीमध्ये रजोगुणाचे प्रमाण जास्त असेल तर त्या व्यक्तीचा कल कृती करण्याकडे जास्त राहील आणि तो झोपूही शकणार नाही. याचा अर्थ झोप घेण्यासाठी त्याला काही प्रमाणात तमोगुणाची गरज भासेल.

दुसरा भाग, वर्तमानक्षणी आपल्यात कोणता गुण अधिक प्रबळ आहे याची जाणिव असली पाहिजे. उदाहरणार्थ, तमोगुणाच्या प्रभावाखाली, एखादी व्यक्ती केवळ एकाच जागी बसून टीव्ही बघत राहील. त्या व्यक्तीच्या जोडीदाराचा रजोगुण प्रबळ असेल त्याला बाहेर जाऊन खरेदी करणे, चित्रपट बघणे किंवा मित्रांकडे जाणे अशी कामे करण्याची इच्छा होईल. तम अणि रज गुणांच्या संवादातून अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. गुणांचा असा संवाद झाल्याने कामाच्या ठिकाणीही निरनिराळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

श्रीकृष्ण सुचवतात की आपण गुणांच्या पलीकडे जावे (गुणातीत होणे) (14.22-14.26). ही अशी अवस्था आहे जिथे आपल्याला सध्याच्या क्षणी आपल्यावर वर्चस्व असलेल्या गुणांची जाणीव आहे आणि आपण भौतिक जगात त्यांच्या परस्परसंबंधित प्रक्रियेचा एक साक्षीदार आहोत.  

Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही