73. शरण जाण्याची कला

 

श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, "तुझे सर्व कर्म मला अर्पण करून तू परमात्म्याला मन लावून, आशेशिवाय, स्नेहविना आणि तापविना युद्ध कर" (3.30). हा श्लोक गीतेचा सारांश आहे आणि तो दैनंदिन जीवनातील आपल्या अनेक शंकांचे निरसन करतो.

आपली पहिली शंका असते आता काय करावेआणि ती उद्भवते कारण आपण जे करतो आहोत त्यात आपण आनंदी नसतो आणि आपल्याला असे वाटत असते की दुसरे काही केल्याने आनंद मिळेल. पण हा श्लोक आपल्याला जे काम दिले आहे किंवा आपण स्वत: निवडलेआहे असे आत्ता हातात असलेले काम आपल्या संपूर्ण क्षमतेनुसार करण्याचा सल्ला देतो. असे कृत्य कुरुक्षेत्र युद्धासारखे क्रूर आणि गुंतागुंतीचे असू शकते, जिथे कोणतीही माराला किंवा स्वतः मारले जाल. वैज्ञानिकदृष्ट्या, आपले जटिल मानवी शरीर एका पेशीपासून विकसित झाले आहे जिथे प्रत्येक क्रिया (उत्परिवर्तन) मागील क्रियेशी जोडलेली आहे. याचा अर्थ असा की आपल्याकडे असलेले कर्म हे नेहमी मागील कर्माच्या मालिकेचे परिणाम असते आणि कोणतेही कर्म एकटे राहत नाही.

पुढचा प्रश्न आहे, ‘आपण कर्म कसे करावे’. हा श्लोक आपल्याला अर्जुनाला येणाऱ्या ताणतणाव किंवा दुःखामुळे निर्माण होणारा अहंकार, इच्छा आणि ताप यांचा त्याग करून कर्तव्य बजावण्याचा सल्ला देतो. इच्छांचा त्याग केल्याने आपल्याला दुःखापासून मुक्ती मिळेल कारण दोन्ही हातात हात घालून जातात.

‘आपल्यासमोर येणार्‍या अडचणींवर मात कशी करावी’ या प्रश्नाचे उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतात, की सगळ्या गोष्टींचा भार त्याच्यावर टाकून द्यावा. येथे श्रीकृष्ण परमात्मा रुप धारण करतात. आपण करत असलेले काम जेव्हा गुंतागुंतीचे असते आपल्याला ज्ञान, शक्ती आणि अनुभव यांची गरज पडते आणि ज्या कुणाकडे हे असते त्याची आपण मदत घेतो. सर्वोच्च मागणे म्हणजे परमात्म्याला शरण जाणे असते, विशेषत: जेव्हा एखाद्या समस्येवरील उत्तर हे आपल्या आवाक्याबाहेरचे असते.

अहंकार हे दुर्बलता आणि भीतीचे प्रतीक आहे, जे आपल्या अस्तित्वासाठी भौतिक संपत्ती आणि ओळखीची मदत घेते. तर, सर्व काही देवावर सोडून देण्यासाठी शक्ती आणि धैर्य आवश्यक आहे.


Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही