80. मायेचे प्रकटीकरण
फिरत्या
चाकाला फिरण्यासाठी जसे स्थिर असे एक्सल हवे असते तसे सतत बदलणार्या भौतिक जगाला
आपले अस्तित्व टिकवण्यासाठी शांत आणि स्थायी अशी अप्रकट गोष्ट हवी असते. अर्जुन
आपल्याप्रमाणेच दृश्य स्वरुपातील मानव आहे आणि त्याला तशाच प्रकट स्वरुपातील
आपल्या नातेवाईकांची मृत्युची चिंता लागली आहे. सर्वश्रेष्ठ असा श्रीकृष्ण ज्याने
सध्या प्रकट रुप धारण केले आहे तो अर्जुनाला हे समजावून सांगतो आहे की अप्रकटालाही
कधी कधी प्रकट रुप धारण करण्याची गरज भासते.
श्रीकृष्ण
म्हणतो,
"मी
अजन्मा, शाश्वत आणि सर्व
प्राणीमात्रांचा स्वामी आहे. माझ्या स्वभावाला वश करून, मी माझ्या योगमायेद्वारे अवतार घेतो” (4.6). मायेद्वारे, जी केवळ एक
कल्पना आहे, अव्यक्त प्रकट
होते, जसे परमात्मा
करतो. फरक फक्त जाणीव, इच्छा आणि करुणेच्या पातळीवर आहे.
श्रीकृष्ण
पुढे म्हणतात, “ज्या ज्या वेळी धर्माचा र्हास होतो आणि अधर्म प्रबळ होतो, त्या
त्या वेळी मी प्रकट होतो (4.7). सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या निर्दालनासाठी आणि
धर्मसंस्थापनेसाठी मी युगानुयुगे जन्म घेतो आहे’’ (4.8).
सज्जनांच्या
रक्षणार्थ परमात्मा निश्चितपणे येईल याची खात्री देण्यासाठी ज्ञानी माणसे या
श्लोकाचा वारंवार उल्लेख करतात. त्याचा सोपा अर्थ असा आहे की धर्माचा किंवा
नैतिकतेचा र्हास होईल आणि अधर्म किंवा वाईट शक्ती वाढतील तेव्हा परमात्मा अवतार
घेऊन परत पृथ्वीवर येईल.
अधिक
खोलवर विचार केला तर नेमके धर्म आणि अधर्म म्हणजे काय, साधू आणि दुष्ट म्हणजे काय
आणि त्यांच्यात कसा फरक करावयाचा असे
प्रश्न निर्माण होतात.
साधू
आणि दुष्ट यांच्यासंदर्भात त्या व्यक्तींचे रक्षण किंवार नाश करण्यापेक्षा त्यांचे
साधुत्व किंवा वाईटपण या प्रवृत्तींचे अनुक्रमे रक्षण आणि नाश करणे गरजेचे असते.
त्याचप्रमाणे, शाश्वत स्थितीकडे जाण्यासाठी किंवा तिच्यापासून दूर जाण्यासाठी
अनुक्रमे धर्म आणि अधर्म यांचा अंगिकार करता येतो आणि मार्गाची दिशा बदलण्यासाठी
देवाची मदत आवश्यक असते.

Comments
Post a Comment