82. जे पेराल, ते उगवेल

 

भौतिक घटक अंदाज करण्यायोग्य वर्तन आणि गुणधर्मांद्वारे शासित असतात. श्रीकृष्ण सर्वशक्तिमान आणि प्रकट यांच्यातील नातेसंबंधात अंतर्दृष्टी देतात जेव्हा ते म्हणतात, “जे  भक्त मला जसे भजतात, मीही त्यांना तसाच भजतो. कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात” (4.11).

प्रथम, हे देवाकडून दिलेले आश्वासन आहे, भक्तीचा आपण कोणताही मार्ग अंगिकारला आणि हे सगळे मार्ग कितीही परस्परविरोधी वाटत असले तरीही, हे सगळे मार्ग अखेर अप्रकट अशा परमात्म्यापर्यंत पोहोचत असतात. दुसरे म्हणजे देव बहुमितीय आरशासारखा असतो ज्यामध्ये आपल्या सगळ्या भावना, विचार आणि कृतींचे प्रतिबिंब पडत असते. तिसरे म्हणजे आपण जेव्हा एखादे बी पेरतो, त्याचे पूर्ण झाड होण्यास वेळ लागतो आणि या प्रतीक्षेमुळेच आपल्याला परमतत्त्वाला पूर्ण समजून घेण्यात अपयश येत असते.

आपण जर विनाशर्त प्रेम आणि श्रद्धा बाळगली तर आपल्यालाही असेच प्रेम आणि श्रद्धा मिळेल ज्यामुळे आपली आयुष्ये अधिक आनंदी होतील. आपण राग, भीती, तिरस्कार, क्रूरता किंवा असूया पेरली तर आपल्यालाही तेच मिळून आणि आयुष्य दु:खमय होईल. अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात. पेरणे आणि उगवणे या दोन गोष्टींचा मधला काळ बराच मोठा असल्याने या दोहोंमध्ये काही संबंध आहे हे आपण विसरून जातो.

हा श्लोक सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन्ही पातळ्यांवर काम करतो. आपली मोठी स्वप्ने साकार करण्याच्या प्रयत्नात, आपण कधीही लहान विजय गमावू नये. हा विजय आपल्याला प्रायोगिक स्तरावर परम चेतनेची जाणीव होण्यास मदत करतो.

श्रीकृष्ण पुढे म्हणतात, “या मनुष्य लोकात कर्मांच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात; कारण त्यांना कर्मांपासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकर मिळते” (4.12).

देवता हे दुसरे तिसरे काही नसून परमात्म्याची रुपे आहेत. परमात्मा समजून घेण्यासाठी आपल्याला अहंकार सोडावा लागेल, मात्र त्यासाठी वेळ लागतो. देव हे परमात्म्याचा साक्षात्कार होण्याच्या प्रवासातील मध्यबिंदू आहेत, जिथे आपला अहंकार अजूनही कायम आहे.


Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही